24 January 2021

News Flash

Hero Passion Pro झाली महाग, जाणून घ्या बाइकची नवी किंमत

Hero Passion Pro च्या किंमतीत वाढ

हीरो मोटोकॉर्पची लोकप्रिय बाइक Passion Pro महाग झाली आहे. कंपनीने Hero Passion Pro च्या किंमतीत वाढ केली आहे. कंपनीने नवीन पॅशन फ्रो यावर्षीच्या सुरूवातीलाच लाँच केली होती. पण करोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन लागू झाल्याने ही बाइक मे 2020 पासून विक्रीसाठी उपलब्ध झाली.

Hero Passion Pro ची नवीन किंमत :-
हीरोने पॅशन प्रोच्या किंमतीत 760 रुपयांची वाढ केली आहे. किंमतीत झालेल्या वाढीनंतर या बाइकच्या ड्रम व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 66 हजार 500 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 68,700 रुपये झाली आहे. लाँच झाल्यापासून कंपनीने या बाइकच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. किंमतीत वाढ करण्याचं कारण कंपनीकडून सांगण्यात आलेलं नाही, पण इनपुट कॉस्ट वाढल्याने बाइकच्या किंमतीत वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवीन लूक :-
नवीन पॅशन प्रो फेब्रुवारीमध्ये लाँच झाली होती. जुन्य मॉडेलच्या तुलनेत नवीन बाइकचा लूक वेगळा आहे. यामध्ये 4 नवीन कलरचे पर्याय देण्यात आलेत. बाइकमध्ये रिवाइज्ड हेडलॅम्प, नवीन H-पॅटर्न टेललॅम्प आणि ब्लॅक अ‍ॅलॉय व्हिल्स आहे. अपडेटेड हीरो पॅशन प्रो नवीन डायमंड फ्रेमवर बनवण्यात आली आहे, त्यामुळे बाइकचं वजन (कर्ब वेट) कमी होतं, परिणामी उत्तम परफॉर्मन्स आणि जास्त मायलेज मिळतो.

पॉवर :-
नवीन हीरो पॅशन प्रोमध्ये नवीन 110 cc, सिंगल-सिलिंडर इंजिन मिळेल. हे इंजिन 7,500 rpm वर 9.02 bhp ची पॉवर आणि 5,500 rpm वर 9.79 Nm टॉर्क निर्माण करतं. इंजिनसोब 4-स्पीड गिअरबॉक्स आहेत. जुन्या मॉडेलच्या तुलनेत अपडेटेड पॅशन प्रोमध्ये 9 टक्के अधिक पॉवर आणि 22 टक्के जास्त टॉर्क जनरेट होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 11:47 am

Web Title: hero passion pro price increased again check new price sas 89
Next Stories
1 मुंबईच्या कंपनीने सुरू केलं ‘व्हॅक्सिन टुरिझम’, चार दिवस अमेरिकेत जाऊन घ्या करोनाची लस !
2 Twitter ला टक्कर देणार स्वदेशी Tooter; पाहा काय आहे खास
3 भारतीयांसाठी गुगलकडून गुड न्यूज, Google Pay बाबतचं ‘ते’ वृत्त फेटाळलं
Just Now!
X