हीरो मोटोकॉर्प कंपनीने नवी Pleasure स्कुटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. Hero Pleasure Plus 110 या नावाने ही नवी स्कुटर कंपनीने बाजारात आणली आहे. शीट मेटल व्हिल आणि अॅलॉय व्हिल अशा दोन व्हेरिअँटमध्ये कंपनीने ही स्कुटर उपलब्ध आहे. अनुक्रमे 47 हजार 300 रुपये आणि 49 हजार 300 रुपये इतकी या स्कुटरची एक्स शोरुम किंमत आहे.

जुन्या मॉडेलच्या तुलनेत नव्या Pleasure मध्ये ताकदवान इंजिन वापरण्यात आलं आहे. या स्कुटरला मॉडर्न रेट्रो लूक देण्यासाठी हेडलँपचं डिझाइन पूर्णतः बदलण्यात आलं आहे. फ्रंट पॅनलवर इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. साइड पॅनल आणि रिअर डिझाइनमध्येही बदल करण्यात आला आहे. दोन्ही साइड पॅनलवर सिल्वर कलरची हाइलाइट आहे. टेललाइटसाठी नवं डिझाइन देण्यात आलं असून सीटखाली युएसबी पोर्ट आहे. स्कुटरच्या इंस्ट्रूमेंट कंसोलमध्ये बदल करण्यात आला असून यावर नवीन डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे.

पावर आणि ब्रेकिंग –
स्कुटर इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम (IBS) हे फीचर असलेल्या या स्कुटरमध्ये 110.9cc क्षमतेचं सिंगल-सिलिंडर इंजिन असून याद्वारे 8.1hp पावर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट होतं. जुन्या प्लेजरमध्ये 102cc क्षमतेचं इंजिन होतं. नव्या स्कुटरचं वजन 101 किलो आहे. पुढील आणि मागील बाजूला 130 mm ड्रम ब्रेक आहे.