21 September 2020

News Flash

Heroच्या ‘स्प्लेंडर’ला 25 वर्ष पूर्ण , विशेष आवृत्ती लाँच; किंमत…

नव्या स्प्लेंडरमध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट, ट्युबलेस टायर आणि भारतीय रस्ते लक्षात घेऊन...

Hero कंपनीच्या स्प्लेंडर या दुचाकीला भारतीय बाजारात दाखल होऊन 25 वर्ष पूर्ण झालेत. आपल्या लोकप्रिय दुचाकीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कंपनीने स्प्लेंडरची एक विशेष आवृत्ती लाँच केली आहे. कॉस्मेटीक अपडेटसह कंपनीने ही स्प्लेंडर बाजारात आणली आहे. 2019 हिरो स्प्लेंडरच्या या विशेष आवृत्ती दुचाकीची एक्स शोरुम किंमत 55 हजार 600 रुपये आहे.

या बाइकची लांबी 2000 mm, रुंदी 720mm आणि उंची 1,040 mm आहे. नव्या स्प्लेंडरमध्ये मोबाईल चार्जिंग सॉकेट, नवीन मॅट ब्लॅक अॅलॉय व्हिल, ट्युबलेस टायर आहेत. पुढील बाजूच्या सस्पेंशनची जबाबदारी टेलिस्कॉपिक शॉक अॅब्जार्बरवर आहे. तर मागील बाजूला 5 स्टेप अॅडजस्टेबल ट्विन हायड्रॉलिक शॉक अॅब्जार्बर आहेत. या नव्या बाइकमध्ये मॅकेनिकली कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये 97cc सिंगल सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8.36bhp ची पावर आणि 8.05 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. बाइकच्या पुढील आणि मागील बाजूला ड्रम ब्रेक्स आहेत. तर 10.5 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी आहे. भारतीय रस्ते लक्षात घेऊन कंपनीने या स्प्लेंडरमध्ये 159mm इतका ग्राउंड क्लिअरन्स दिला आहे.

विशेष आवृत्ती असलेल्या स्प्लेंडरमध्ये कॉस्मेटिक अपडेट्समध्ये इलेक्ट्रिक स्टार्ट, समोरील बाजूला AHO हॅलोजन हेडलँप, टेलिस्कॉपिक फ्रंट फॉर्क, अॅडजस्टेबल रिअर शॉकॉप्सर, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम हे फीचर्स आहेत. ही विशेष आवृत्ती कंपनीच्या स्प्लेंडर प्लस या दुचाकीवर आधारीत आहे, स्प्लेडर प्लसच्या टॉप व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 54 हजार 600 रुपये आहे. म्हणजेच या नव्या दुचाकीसाठी तुम्हाला हजार रुपये जास्त खर्च करावे लागतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2019 10:40 am

Web Title: hero splendor 25th anniversary special edition launch know price and specifications
Next Stories
1 तणावाच्या तपासणीसाठी नवी सोपी चाचणी
2 Xiaomi ने भारतात लाँच केले Mi Polarised Square सनग्लासेस
3 कीटकनाशकांमुळे मुलांना रक्तदाबाची जोखीम
Just Now!
X