News Flash

उच्च रक्तदाबाची लक्षणे आणि उपाय

अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ आहे

डॉ. बिपीनचंद्र भामरे

वाढत्या जागतिकीकरणासोबतच आपली जीवनशैलीही झपाट्याने बदलत आहे. रोजच्या कामाची दगदग वाढली आहे. त्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत आहे. अनेकांना लठ्ठपणा, स्थुलता, नैराश्य, ब्लडप्रेशर या सारख्या समस्या उद्धभवत असल्याचं दिसून येतं. या साऱ्यात जीवनशैलीशी निगडित आजार म्हणून ओळखला जाणाऱ्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या आजाराबाबाबत लोकांमध्ये योग्य माहिती असणं गरजेचं आहे.

उच्च रक्तदाबाची ही आहेत लक्षणे :

अतिरक्तदाब हा मुनुष्याचा ‘छुपा शत्रू’ आहे, असे म्हटले जाते. कारण बऱ्याचदा मनुष्याला उच्च रक्तदाब असूनही काहीही लक्षणे किंवा त्रास दिसून येत नाही. उच्च रक्तदाबाची लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात.

१. सतत डोके दुखणे, जड वाटणे.

२.चक्कर येणे, आसपासच्या वस्तू हलत असल्याचा भास होणे, कामात लक्ष केंद्रित न होणे, एकाग्रता न होणे, विसर पडणे, थकवा जाणवणे, चिडचिड करणे.

३. छातीत धडधड होणे, छातीत दुखणे.

या पद्धतीने रक्तदाब ठेवा नियंत्रणात 
१. संतुलित आहार-

साखर, मीठ, मेद व कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ खाणे टाळा. ताजी फळे, लो फॅट्स डेअरी प्रॉडक्ट्स, धान्य आणि हिरव्या पालेभाज्या खा. मद्य आणि धूम्रपानाचे सेवन करू नका.

२. दररोज व्यायाम करा –

असे केल्याने रक्ताभिसरण सुरळीतपणे होते आणि हृदयाच्या स्नायूवरील ताण कमी होतो. तसेच वजन वाढीवर नियंत्रण मिळविता येते.

३. नियमित तपासणी व डॉक्टरांचा सल्ला घ्या –

चक्कर येणे, डोकेदुखी, कामात लक्ष न लागणं यापैकी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर निश्चितच डॉक्टरांचा सल्ला घ्या व त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा. आपण वेळेवर औषधे घेत असल्याची खात्री करा.

रक्तदाब म्हणजे काय?

हृदय हा एक स्नायूंनी बनलेला पोकळ अवयव आहे. त्याच्या तालबद्ध हालचालीमुळे (आकुंचन पावणे (सिस्टोल) आणि प्रसरण पावणे (डायस्टोल) रक्त शरीरभर फिरत असते. शरीरात रक्त वाहताना रक्तवाहिन्यांवर जो दाब पडतो किंबहुना ज्या दाबाने रक्त सर्व शरीरातील रक्तवाहिन्यांतून फिरत असते त्या दाबाला ‘रक्तदाब’ असे म्हणतात. सर्व अवयवांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे रक्तपुरवठा मिळण्यासाठी हा विशिष्ट प्रकारचा दाब आवश्यक असतो. उच्च रक्तदाब अर्थात हाय-ब्लड-प्रेशर किंवा यालाच वैद्यकीय भाषेत आपण हाय-पर-टेन्शन असे देखील म्हणतो.

उच्च-रक्त-दाब म्हणजेच शरीरातील रक्तवाहिन्यांमधून जेव्हा रक्त वहन करत असते तेव्हा रक्तवहनाचा प्रचंड दाब रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडत असतो. जेव्हा हृदय आरामदायी पूर्वस्थितीत येते तेव्हा रक्तवहिन्यांच्या अंतर-स्तरावरील दाब कमी होतो त्याला डायास्टोलिक रक्तदाब असे म्हणतात. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या हृदयाला काम करण्यास खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे हृदय मोठे आणि जाड होऊ शकते. त्याची कार्यक्षमता कमी कमी होत जाते. त्यामुळे हृदयाचे पंपिंग कमी होते. याला ‘हार्ट फेल्युअर’ असे म्हणतात.

(डॉ. बिपीनचंद्र भामरे, कार्डिओ थोरॅसिक सर्जन, सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 4:04 pm

Web Title: high blood pressure health care tips ssj 93
Next Stories
1 अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन म्हणजे काय? टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी
2 Whatsapp वर तुम्हाला कोणी अश्लील मेसेज पाठवतंय का? ‘इथे’ करा तक्रार, होईल कारवाई
3 २५२GB डेटा चा Jio चा नवीन प्लॅन, जाणून घ्या व्हॅलिडिटी आणि बेनिफिट्स
Just Now!
X