20 January 2019

News Flash

अतिसंवेदनशील मेंदूमुळेच रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी

माणसासह प्राण्यांचा मेंदू निसर्गाच्या घडामोडींचे आकलन एका ठरावीक वेगामध्ये करत असतो.

डोकेदुखी

अतिसंवेदनशील मेंदू असलेल्या रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखीला सामोरे जावे लागण्याची शक्यता एका अभ्यासातून समोर आली आहे.

सर्वसाधारण मेंदूपेक्षा अतिसंवेदनशील असलेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये निसर्गाच्या इतर संवेदनशीलतेपेक्षा जास्तच संवेदनशीलपणा असतो. याला फायब्रोमील्जीया असे म्हणतात. या रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास सतावत असतो, असे मिशीगन विद्यापीठाच्या संशोधकांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

सर्वसाधारणपणे माणसासह प्राण्यांचा मेंदू निसर्गाच्या घडामोडींचे आकलन एका ठरावीक वेगामध्ये करत असतो.

मात्र अतिसंवेदनशील असलेल्या मेंदूमधील चेतापेशी जरा जास्तच आकलन (सिंक्रोनाइज) करण्यात गुंततात. यामुळे त्यांच्यावर जास्त ताण येत असल्याचे प्राध्यापक रिचर्ड हॅरिस यांनी सांगितले. याला अतिप्रमाणातील सिंक्रोनायजेशन (ईएस)म्हणतात.

विजेच्या संचामध्ये जसे वीज वहन करतेवेळी आदानप्रदान होते, तशीच पद्धती या अभ्यासादरम्यान वापरण्यात आली.

या पद्धतीला आजपर्यंत भौतिकशास्त्रामध्ये वापरले जात होते.

आरोग्याच्या बाबतीत प्रथमच ही पद्धत वापरून संशोधकांनी मेंदूच्या तीव्र डोकेदुखीवर संशोधन केले आहे. संशोधकांनी फायब्रोमील्जीया असलेल्या दहा महिलांना निरीक्षणाखाली ठेवले होते.

या महिलांच्या मेंदूमध्ये इलेक्ट्रिकल हालचाली जास्त वेगात होत असल्याचे आढळून आले. यावर अभ्यास केला असता या महिलांच्या मेंदूमधील चेतापेशी सर्वाधिक सक्रिय असल्याचे आढळले. यामुळे मेंदूची प्रक्रिया प्रमाणापेक्षा जास्त सुरू राहिल्याने रुग्णाला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे.

ही प्रक्रिया ईएससारखीच असते, मात्र फायब्रोमील्जीयाचे रुग्ण इलेक्ट्रॉनिकली अस्थिर आणि संवेदनशील असल्याचे दिसून आले. ईएसची प्रक्रिया जेव्हापासून संगणकावर वापरण्यात आली तेव्हापासून या अतिसंवेदनशीलतेच्या मेंदूंवर उपचार करून ते सध्याच्या परिस्थितीपेक्षा स्थिर करता येत असल्याचेही आढळल्याचे उनचेओल ली यांनी सांगितले.

First Published on January 14, 2018 2:31 am

Web Title: highly susceptible brain cause acute headache in patients