करोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे. या महामारीमध्ये प्रत्येक जण एका योध्याप्रमाणे लढत आहे. या वातावरणातच भारतीय रेल्वेनं ५६१ पदांची भरती जाहीर केली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वेने विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंट, फार्मासिस्ट, हॉस्पिटल अटेंडेट या पदांचा समावेश आहे. यामध्ये नर्सिंग सुपरिटेंडेंट २५५ जागा, फार्मासिस्टसाठी ५१ जागा आणि हॉस्पिटल अटेंडेट, ओटीए, ड्रेसर या पदांसाठी २५५ जागा आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पदांसाठी इच्छुक उमेदवार २२ मे २०२० पर्यंत अर्ज दाखल करु शकतात. महत्वाचं म्हणजे उमेदवारांची निवड मेरिट लिस्टनुसार केली जाईल. या भरतीत विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे १२ पास उमेदवारही अर्ज दाखल करु शकतात.

More Stories onजॉबJob
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hiring at indian railways covid 19 care centres apply for 561 paramedical staff posts nck
First published on: 16-05-2020 at 16:30 IST