यावर्षी होणाऱ्या ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये एचएमडी ग्लोबल ही नोकियाचे स्मार्ट फोन तयार करणारी कंपनी काही नवे फोन लाँच करणार असल्याची चर्चा आहे. हे फोन ‘नोकिया ९’, ‘नोकिया १’, ‘नोकिया ७ प्लस’ असू शकतात. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी नव्यानं लाँच करण्यात आलेला ३३१० या स्मार्टफोनचं ४ जी व्हर्जनदेखील नोकिया ‘मोबाईल वर्ल्ड काँग्रेस’ लाँच करणार आहे. पण, या फोनपेक्षा नोकिया ५ कॅमेरा असणारा फोन लाँच करणार असल्याची चर्चा सर्वाधिक पाहायला मिळाली.

पाच कॅमेरा असलेला फोन कोणता असू शकतो हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. पण, नोकिया पाच कॅमेरा असलेला फोन २०१८ मध्ये लाँच करणार असल्याची माहिती अनेक इंग्रजी संकेतस्थळांनी दिली आहे. नोकिया नव्यानं लाँच करणाऱ्या फोनमध्ये पेन्टा लेन्स बसवणार आहे. ज्यात एकूण ५ कॅमेरा आणि २ एलइडी फ्लॅश असणार आहे अशी माहिती पुढे आली आहे. नोकियाच्या ओझो VR कॅमेरासारखी याची रचना असणार आहे. २०१८ च्या शेवटी हा फोन लाँच होणार आहे. फक्त नोकियाच नाही तर काहीदिवसांपूर्वी हुवाई या कंपनीनंदेखील ५ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लाँच करणार असल्याची घोषणा केली. हुवाई फ्रेबुवारी महिन्यात होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला ५ कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच करणार आहे, हा फोन फ्लिपकार्टच्या या ई कॉमर्स साईटवरून ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.