‘नोकिया’चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Nokia 5.4 खरेदी करणाऱ्यांना कंपनी 1500 रुपयांचं एक गिफ्ट कार्ड देत आहे. केवळ कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी केल्यावरच या ऑफरचा फायदा घेता येईल. 31 मार्चपर्यंत ही ऑफर वैध असेल. फोन डिलिव्हर झाल्यानंतर सात दिवसांनी ग्राहकाच्या नोंदणीकृत इमेल आयडीवर गिफ्ट कार्ड पाठवलं जाईल.

1500 रुपयांचं गिफ्ट कार्ड मिळाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत ते वैध असेल. 30 दिवसांच्या कालावधीत ग्राहक या गिफ्ट कार्डचा वापर करुन नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन त्यांच्या आवडीचं प्रोडक्ट खरेदी करु शकतात. Nokia 5.4 मध्ये क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आणि एक सेल्फी कॅमेरा म्हणजेच एकूण पाच कॅमेरे आहेत. सोबतच पंचहोल डिस्प्लेही आहे. हा फोन डस्क आणि पोलार नाइट कलरमध्ये खरेदी करता येईल.

Nokia 5.4 स्पेसिफेकशन्स :
Nokia 5.4 फोनमध्ये ड्युअल सिमकार्डचा पर्याय असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट मिळेल. या फोनसाठी अँड्रॉइड 11 चाही सपोर्ट मिळेल. फोनमध्ये 6.39 इंचाचा HD+ डिस्प्ले असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 6 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणंही शक्य आहे.

Nokia 5.4 कॅमेरा :
Nokia 5.4 मध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर, अन्य लेन्स अनुक्रमे 5, 2 आणि 2 मेगापिक्सेलचे आहेत. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. फ्रंट कॅमेरा पंचहोल स्टाइलमध्ये आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, ब्लूटूथ 4.2, GPS/A-GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर हे फिचरही मिळेल. तसेच फोनमध्ये 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 4000mAh ची बॅटरीही मिळेल.

Nokia 5.4 भारतात किंमत :
Nokia 5.4 च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे.