नोकियाचे स्मार्टफोन बनविणाऱ्या एचएमडी ग्लोबलने भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन आणि दोन फीचर फोन लाँच केले आहेत. कंपनीने Nokia C3, Nokia 125, Nokia 150 आणि Nokia 5.3 हे चार फोन आणले आहेत. यातील Nokia 125 आणि Nokia 150 फीचर फोन आहेत. तर, नोकिया सी3 आणि नोकिया 5.3 स्मार्टफोन आहेत. दोन्ही फीचर फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध असतील, तर स्मार्टफोनसाठी लवकरच प्री-बुकिंगला सुरूवात होणार असून विक्री सप्टेंबरमध्ये सुरू होणार आहे.

नोकियाच्या चारही फोनची किंमत :-
Nokia 5.3 च्या 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 499 रुपये आहे. तर, Nokia 150 ची किंमत कंपनीने 2 हजार 299 रुपये आणि  Nokia 125 ची किंमत 1 हजार 999 रुपये ठेवली आहे. याशिवाय Nokia C3 या स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 7 हजार 499 रुपये व 3जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.

Nokia C3 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia C3 हा एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे. यात 5.99 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यामध्ये Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 3040mAh क्षमतेची बॅटरी असून 50 तासांचा टॉकटाइम बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि गुगल असिस्टंटसाठी वेगळं बटण आहे. तसेच यात 2 जीबी आणि 3 जीबी रॅमचा व 16 जीबी आणि 32 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो युएसबी आणि एफएम रेडिओ आहे.

Nokia 5.3 स्पेसिफिकेशन्स :-
हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असून यामध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर स्नॅपड्रैगन 665 प्रोसेसर आहे. नोकियाच्या या फोनमध्ये 6.55 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. यात 13 मेगापिक्सेल, 5 मेगापिक्सेल, 2 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यांचा समावेश आहे. फोनमध्ये 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल, शिवाय मेमरी कार्डद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, एफएम रेडिओ, युएसबी टाइप सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहे. फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4000mAh क्षमतेची बॅटरीही आहे.

Nokia 125 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 125 मध्ये 2.4 इंच स्क्रीन आहे. फोनमधील बटण आकाराने मोठे आहेत. यात कंपनीचा लोकप्रिय सापाचा गेम खेळता येईल. एफएम रेडियो असलेल्या या फीचर फोनमध्ये 4एमबी रॅम आणि 4एमबी स्टोरेज आहे. नोकिया 125 मध्ये 1020mAh बॅटरी आहे. याद्वारे 19.4 तासांचा टॉकटाइम बॅकअप भेटतो असा कंपनीचा दावा आहे. फोनमध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक, एफएम रेडिओ आणि 2,000 कॉन्टेक्ट सेव्ह करण्याची सुविधा आहे. व्हीजीए कॅमेरा,

Nokia 150 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 150 मधील जवळपास सर्व फीचर्स नोकिया 125 प्रमाणे आहेत. याशिवाय या फोनमध्ये व्हीजीए कॅमेरा आणि 32 जीबीपर्यंत एक्सपांडेबल स्टोरेज आहे. फोनचा डिस्प्लेही 2.4 इंचाचा आहे. नोकिया 150 फोनमध्ये एमपी3 प्लेयर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 3.0 असून 90.54 ग्रॅम इतकं या फोनचं वजन आहे.