जोरात शिंक आलेली असताना तुम्ही तोंडावर किंवा नाकावर हात ठेऊन ती थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर असे करणे जीवघेणे ठरु शकते. हो वाचायला विचित्र वाटतं असले तरी शिंक थांबवून धरल्याचे अनेक तोटे असल्याचे डॉक्टर सांगतात. जाणून घेऊयात शिंक थांबवल्याने काय काय होऊ शकते…

>
बीएमजी केस रिपोर्टसमध्ये छापून आलेल्या एका वृत्तानुसार नाक आणि तोंड बंद करुन शिंक कशी थांबवावी हे दाखवण्याच्या प्रयत्नात असताना एक ३४ वर्षीय व्यक्ती जखमी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. शिंकेवाटे बाहेर येणारी हवा नाक तोंड बंद करुन रोखून धरल्याने या व्यक्तीचा गळा सूजला. त्यानंतर त्या व्यक्तीला गोष्टी गिळताना त्रास होऊ लागला आणि त्याच्या तोंडातून आवाज येणेच बंद झाले. ब्रिटनमधील लीसेस्टर विद्यापिठातील रुग्णायलातील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. सात दिवस उपचार घेतल्यानंतर या व्यक्तीला होणार त्रास कमी झाल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. म्हणूनच नाक आणि तोंड बंद ठेऊन शिंकणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देतात.

>
जेव्हा आपण शिकंतो तेव्हा तोंडावाटे अंदाजे ८० किमी/तास वेगाने हवा बाहेर फेकली जाते. मात्र शिंकण्याऐवजी ती शिंक थांबवून ठेवल्यास हवा आणि त्या हवेतील दबाव शरीरामध्येच अडकून राहतात. हे आरोग्यासाठी घातक असते.

>
शिंक थांबवल्यास कानाचे पडदे फाटू शकतात किंवा रक्तवाहिनीही फुटून अंतर्गत रक्तस्त्रावही होण्याची शक्यता नाकारता येत नाही

>
शिंक थांबवून ठेवल्यास शरीराबाहेर येणारी हवा बाहेर न पडू दिल्यास ही हवा बुडबुड्यांच्या माध्यमातून छातीत साठून राहते. त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

>
अमेरिकेतील टेक्सास विद्यापिठातील शरीर विज्ञान केंद्राचे प्रमुख आणि मानेच्या शस्त्रक्रियेचे तज्ञ डॉ. जी यांग जियांग शिंक यांच्या सांगण्यानुसार शिंक थांबवल्याने शरिराला होणारे नुकसान हे मानेत गोळी लागल्यावर होणाऱ्या नुकसानाइतकेच असते. वाचायला विचित्र वाटत असले तरी खरोखरच एक थांबवलेली शिंक तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.

>
बळजबरीने शिंक थांबवण्याचा प्रयत्न केल्यास एकदम गंभीर परिस्थितीमध्ये फुफ्फुसे पूर्णपणे निकामी होऊ शकतात असेही डॉक्टर सांगतात.

>
शरीरामधील एखादा जंतू किंवा बॅक्टेरिया बाहेर टाकण्याची गरज असते त्यावेळी शिंक येते. त्यामुळे अशावेळेस शिंक थांबवल्यास ती हवा त्या जंतूसहीत शरीरामध्ये साठून राहून तुमची तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत ठरु शकते. त्यामुळेच शिंकेसंदर्भातील अनेक समस्यांपासून वाचण्याचा सर्वात सोप्पा उपाय म्हणजे शिंक आल्यास जोरात शिंका.

(माहिती स्त्रोत – न्यूजवीक आणि एएफपी)