होळीच्या दिवशी उत्तर भारतात केल्या जाणाऱ्या खास पदार्थांपैकी एक म्हणजे थंडाई. या सणाचं आणि थंडाईचं नातं उत्तर भारतात अतूट आहे. तेव्हा होळी, रंगपंचमीच्या दिवशी थंडाई ही घराघरात आवर्जून तयार केली जाते. ही थंडाई घरच्या घरी कशी तयार करतात याची रेसिपी जाणून घेऊयात.

थंडाई साठी लागणारं साहित्य:

बदाम- अर्धा कप

साखर

मिरे

दूध एक ते दीड कप

बडीशोप १ मोठा चमचा

खसखस- २ मोठे चमचे

४ अख्खे वेलदोडे

गुलाबपाणी दोन टेबलस्पून

पाणी

कृती-

१. थंडाईसाठी घेतलेले सगळे बदाम भरपूर पाण्यामध्ये साधारण सहा तास भिजवा. त्यानंतर ते सोला.

२. बडीशोप,खसखस, वेलदोडे आणि मिऱ्याची पूड करून घ्या. ही पूड बारीक असावी.

३. ब्लेंडरमध्ये बदामाची पेस्ट बनवन घ्या. नंतर मसाल्याची पूड, दूध आणि साखर टाकून त्याचं व्यवस्थित मिश्रण बनवून घ्या.

४. हे सगळं मिश्रण बारीक चाळणीतून गाळून घ्या. थोडी थंड करून मग ही गारेगार थंडाई सर्व्ह करा.