निरोगी आरोग्य सगळ्यांनाच हवंहवं असं असतं. मात्र, सध्याच्या बदलत्या काळात तरुणाईसकट प्रत्येक वयोगटातील व्यक्ती फास्टफूडच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे सतत तळलेलं तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊन त्याचा परिणाम हा आरोग्यावर होत असतो. परिणामी, त्यातून अनेक शारीरिक तक्रारी डोकं वर काढू लागतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी आपला आहारदेखील तितकाच सकस आणि पौष्टिक असला पाहिजे. म्हणूनच आयुर्वेदिक डॉ. दिक्षा भास्कर आणि डॉ. भावसार यांनी गुळ आणि चणे (फुटाणे) खाण्याचे फायदे सांगितले आहेत. ते जाणून घेऊयात.

१ मन: स्थिती सुधारते –
गुळ आणि चणे यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ चं पुरेपूर प्रमाण असतं. या दोन्ही घटकांमुळे स्मरणशक्ती बळकट होते. तसंच मेंदूची कार्य करण्याची क्षमतादेखील वाढते. तसंच मूड नियंत्रित करणारे हार्मोन्स सेरोटोनिन आणि नॉरपेनाफ्रिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण कमी होतो. परिणामी, मूड खराब असल्यास गुळ -चणे खावेत.

पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

डॉ. भावसार यांनी गुळ-चणे खाण्याचे खालील काही फायदे सांगितले आहेत.

१.गुळ-चणे खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते.

२. ज्यांच्या शरिरात लोह आणि प्रथिनांची कमतरता, रक्ताची कमतरता आहे त्यांनी गुळ-चणे खावे.

३. मासिक पाळीदरम्यान गुळ-चणे खावे.

४. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

५. हृदयाचे कार्य सुरळीत चालते.

६. अकाली दात पडण्याची समस्या दूर होते.