आपल्याला अनेकदा अचानक थकवा आल्यासारखे वाटते. हात पाय दुखायला लागतात. थोडंसं काम केलं तरीही गळून गेल्यासारखे होते आणि यावर नेमके काय करावे तेही कळत नाही. अशावेळी आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी झालेली असू शकते. कॅल्शियम हा उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो कमी झाल्याने विविध समस्या उद्भवतात. अशावेळी आजारी पडून औषधे घेणे आणि अशक्तपणा घालवण्यासाठी इंजेक्शन्स, टॉनिक्स घ्यायला लागण्यापेक्षा वेळीच घरच्या घरी करता येतील असे उपाय अवलंबल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे आता कॅल्शियमची पातळी कमी झाली हे कसे ओळखायचे, हा घटक आरोग्यासाठी कसा फायदेशीर असतो, कॅल्शियम वाढण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे याबद्दल माहिती घेऊया.

सकाळी लवकर सनबाथ घ्या

sugarcane juice selling Business
Viral Video: लय भारी जुगाड! दुकानदाराने ऊसाचा रस थंड राहण्यासाठी बिना बर्फाचा केला भन्नाट जुगाड; दुकानावर झाली गर्दीच गर्दी
how to get rid of house rats tips
Cleaning tips : घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी ‘गव्हाचा’ करा वापर! पाहा या दोन टिप्स…
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
beauty tips in marathi get rid of dark neck
Beauty tips : मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी काय करावे, काय नको? पाहा ‘या’ टिप्स

सकाळी लवकर कोवळे उन्ह अंगावर घेतले तर शरीरातील व्हिटॅमिन डी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीराची कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता वाढते. तसेच हा कॅल्शियम रक्तात मिसळण्यासही मदत होते. त्यामुळे शरीराला कॅल्शियम मिळण्यासाठी रोज न चुकता १५ मिनिटांचा सनबाथ गरजेचा आहे.

कॅल्शियम असणारे हे पदार्थ खा

कॅल्शियमची कमतरता भरुन काढण्याचा उत्तम उपाय म्हणजे कॅल्शियम असणारे पदार्थ खायला हवेत. त्यामुळे दूध, दही, पनीर, चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा. याबरोबरच संत्री, सोयाबीन आणि इतर सोया उत्पादनांचाही आहारातील समावेश वाढवा, पालेभाज्या खा. तुम्हाला दुधाची अॅलर्जी असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळा पर्याय शोधावा लागेल.

मॅग्नेशियम असणारे पदार्थ घ्या

व्हिटॅमिन डी प्रमाणेच मॅग्नेशियम हेही शरीरातील कॅल्शियम शोषून घेण्याचे काम करते. हे घटक एकमेकांवर अवलंबून असतात. मोहरीची पालेभाजी, ब्रोकोली, पालक, काकडी, हिरवे सोयाबीन इं.

आहारातील सोडीयमचे प्रमाण कमी करा

तुम्हाला एरवीच जास्त मीठ खाण्याची सवय असेल तर तुमच्यात कॅल्शियमची कमतरता आहे हे ओळखा. सोडीयमचे प्रमाण जास्त झाल्यास शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यात अडथळे येतात. अशामुळे हाडे, नखे आणि दातांच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे कमीत कमी मीठ खा.

सोडा आणि शीतपेये पिणे टाळा

शीतपेये तसेच सोडा यांच्या सेवनानेही कॅल्शियम शोषून घेण्यात अडथळे येतात. या पेयांमुळे रक्तातील फॉस्फेटची पातळी वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्तात कॅल्शियम शोषून घेण्याची क्षमता कमी होते.