कोथिंबीर दिसायला हिरवीगार आणि पदार्थाला वेगळाच स्वाद आणणारी. स्वयंपाकघरात कोथिंबीर नसेल तर अनेक महिलांना चुकल्यासारखे होते. भाजी, आमटी, पोहे, उपीट, मिसळ अगदी कोणत्याही पदार्थावर शोभून दिसणारी ही कोथिंबीर आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर असते. शरीराचा दाह शमवणारी म्हणून कोथिंबिरीचा वापर केला जात असला तरी त्यापलिकडेही त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कोथिंबिरीबरोबरच धनेही आरोग्यासाठी उपयुक्त असतात. पाहूयात आरोग्याच्या कोणत्या तक्रारींसाठी याचा उपयोग होतो

१. कोथिंबिरीचा आहारात समावेश ठेवल्यास भूक वाढण्यास मदत होते.

२. अतिसार किंवा पचनाच्या अडचणींवरही कोथिंबीर उपयुक्त असते. त्यामुळे कोथिंबिरीचा आहारात समावेश असणे आवश्यक आहे.

३. डोळ्यांची जळजळ किंवा आग होत असल्यास कोथिंबिरीचा १ किंवा २ थेंब रस डोळ्यात टाकावा. डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते.

४. चेहऱ्यावरील मुरुमांसाठीही कोथिंबीर उपयुक्त ठरु शकते. एक चमचा कोथिंबिरीच्या रसात हळद टाकून ते मिश्रण मुरुमांवर लावावे.

५. मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धने आणि साखर टाकून ते पाणी प्यावे त्याचा निश्चितच फायदा होतो.

६. गर्भवती स्त्रियांना उलट्यांचा जास्त त्रास होत असल्यास भातामध्ये धनेपावडर घालून खावे. नक्कीच फरक होतो.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)