होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडियाने (HMSI) नवीन Activa 125 BS6 स्कुटर परत (रिकॉल) मागवल्यात. खराब कूलिंग फॅन कव्हर आणि ऑइल गेजमुळे(oil gauge)होंडा कंपनीने Activa स्कुटर रिकॉल केल्याची माहिती आहे. होंडाने याबाबत अधिक माहिती दिलेली नाही, किंवा खराब पार्ट्समुळे बाइकवर काय परिणाम होईल याबाबतही कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

( आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच)

कंपनीकडून हे दोन्ही पार्ट्स मोफत बदलवले जाणार आहेत. हे पार्ट्स तपासण्यासाठी आणि बदलण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ लागेल. ज्या स्कुटर परत मागवण्यात आल्या आहेत , त्याबाबत कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. व्हेइकल आयडेंटिफिकेशन नंबरद्वारे तुमची गाडी परत मागवली आहे की नाही हे तुम्ही तपासू शकतात. जर स्कुटर परत मागवली असेल तर पुढील प्रक्रियाही संकेतस्थळावर दिली आहे. याबाबत खराब स्कुटर मालकाच्या मॅन्युअललाही अपडेट केले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

(आणखी वाचा – टू-व्हीलरमध्ये ‘ही’ ठरली नवीन BOSS, ‘स्प्लेंडर’वर केली मात)

जानेवारीमध्ये झाली होती लाँच :-
होंडाने नवीन Activa 125 BS6 स्कुटर यावर्षी 15 जानेवारीला तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केली. नव्या होंडा अॅक्टिव्हामध्ये BS6 कंप्लायंट इंजिनसोबत मोठं सीट, 18 लिटर अंडर-सीट स्टोरेज कंपार्टमेंट, ACG स्टार्टर, LED हेडलँप्स, पास स्विच आणि इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण आहे. स्टँडर्ड व्हेरिअंटची किंमत 67 हजार 490 रुपये (एक्स-शोरुम) आहे. तर, हायर अॅलॉय आणि डीलक्स व्हेरिअंट्सची किंमत अनुक्रमे 70 हजार 990 रुपये (एक्स-शोरुम) आणि 74,490 रुपये (एक्स-शोरुम) आहे.

(आणखी वाचा – स्टॉक संपवण्याचा सेल, Hyundai च्या गाड्यांवर बंपर डिस्काउंट)

( आणखी वाचा – ’10 ऑटोमॅटिक गिअर’ असलेली देशातील एकमेव SUV लाँच)