News Flash

होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च , मारुती डिझायरला देणार टक्कर

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर गॅरंटी देऊ केली आहे.

होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेली Amaze लॉन्च केली आहे. भारतात या कारची आतुरतेने वाट पाहिली जात होती. भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुतीच्या डिझायरसोबत या गाडीची स्पर्धा असेल असं म्हटलं जात आहे.

Amaze च्या पेट्रोल मॉडेलची एक्स शोरुम किंमत 5.59 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.57 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिझेल व्हर्जनची एक्स शोरुम किंमत 6.69 लाख रुपयांपासून सुरू होते, याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 8.67 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने 3 वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर गॅरंटी देऊ केली आहे.

बोल्ड एक्सटीरियर स्टाइल, प्रिमियम इंटीरियर आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स ही Amaze कारची खास वैशिष्ट्ये आहेत. वर्षाच्या सुरूवातीला दिल्लीत झालेल्या Auto Expo 2018 मध्ये होंडा कार्स इंडियाने नेक्स्ट जनरेशन कार अशी ओळख असलेल्या Amaze चे अनावरण केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 4:09 pm

Web Title: honda amaze 2018 launched in india
Next Stories
1 WhatsApp मध्ये आले एकाहून एक भन्नाट फिचर्स , ग्रुप चॅटिंग झाली आणखी मजेदार
2 Video : ऑफिस फोडण्यात यश, चोराचा ‘ब्रेक’डान्स सोशल मीडियावर व्हायरल
3 आमदार मिळतील का आमदार? फ्लिपकार्ट, अॅमेझॉनवर कर्नाटकचे पडसाद
Just Now!
X