होंडा कार्स इंडिया लिमिटेडने (एचसीआयएल) Amaze सेडानमध्ये एक नवीन व्हीएक्स सिव्हिटी टॉप ग्रेड कार बाजारात आणली आहे. 8 लाख 56 हजार 900 रुपये (एक्स शोरुम ) इतकी या नव्या कारची किंमत ठेवण्यात आली आहे. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 9 लाख 56 हजार 900 (एक्स शोरूम) किंमत ठेवण्यात आली आहे.

VX CVT ट्रिममध्ये जे फीचर्स देण्यात आलेत त्यामध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले कनेक्टिव्हीटी, स्टीअरिंग माउंटेड व्हॉइस कंट्रोल स्विच आणि रिअर कॅमेऱ्याचा समावेश आहे.

या न्यू टॉप ग्रेड व्हीएक्स सीव्हीटी होंडा अमेझ बद्दल बोलताना होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे विक्री आणि विपणन वरिष्ठ उपाध्यक्ष व संचालक राजेश गोयल म्हणाले, “दुसऱ्या पिढीच्या होंडा अमेझने तिच्या सेगमेंटमध्ये एक बेंचमार्क स्थापित केला आहे.आमचे 20% हून अधिक ग्राहक पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये अद्ययावत सीव्हीटी व्हेरिएंट्सकडे वळत आहेत. होंडा अमेझची टॉप स्पेक व्हीएक्स रेंज पूर्ण करून ग्राहकांना निवडीसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन व्हीएक्स सीव्हीटी व्हेरिएंट सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.”