Honda ने आपली लोकप्रिय सब-कॉम्पॅक्ट सेडान Amaze ही कार बीएस6 इंजिनसह लाँच केली आहे. नव्या बीएस 6 निकषांप्रमाणे अपडेट करण्यासोबतच कंपनीने कारच्या किंमतीतही वाढ केलीये. नवीन BS6 Honda Amaze ची एक्स-शोरुम किंमत 6.10 लाख ते 9.96 लाख रुपयांदरम्यान आहे. आधीच्या बीएस4 व्हर्जनच्या तुलनेत नव्या व्हर्जनची किंमत नऊ हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

होंडाने Amaze चे पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन बीएस-6 मध्ये अपडेट केलेत. आता पेट्रोल इंजिन-मॅन्युअल गिअरबॉक्सची किंमत 6.10 लाख ते 7.93 लाख रुपयांदरम्यान झाली आहे. यापूर्वी किंमत 5.93 लाख ते 7.81 लाख रुपये होती. पेट्रोल इंजिन-सीव्हीटी गिअरबॉक्स व्हेरिअंट्सची किंमत 7.72 लाख ते 8.76 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी किंमत 7.63 लाख ते 8.64 लाख रुपये होती. तर, डिझेल इंजिन मॅन्युअल व्हेरिअंटची किंमत आता 7.56 लाख ते 9.23 लाख रुपये झाली आहे. याआधी बीएस4 व्हर्जनची किंमत 7.05 लाख ते 8.93 लाख रुपये होती. डिझेल-सीव्हीटीची किंमत 8.92 लाख ते 9.96 लाख झाली असून आधीच्या व्हर्जनची किंमत 8.65 लाख ते 9.66 लाख रुपये होती.

पेट्रोल आणि डिझेल मॉडेलच्या किंमतीत किती वाढ –
बीएस4 मॉडेलच्या तुलनेत बीएस-6 पेट्रोल इंजिनच्या Amaze ची किंमत 9 हजार ते 17 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. तर, बीएस-6 डिझेल इंजिन मॉडेलच्या किंमतीत 27 हजार ते 51 हजार रुपयांपर्यंत वाढ झालीये. डिझेल इंजिन-मॅन्युअल गिअरबॉक्सच्या बेस मॉडेल Amaze(E MT) च्या किंमतीत सर्वाधिक 51 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आणखी वाचा – नव्या अवतारात आली Renault Triber , किंमतही बदलली

पेट्रोल इंजिन पावर आणि मायलेज –
बीएस6 मध्ये अपडेट झाल्यानंतरही Amaze ची पावर बीएस-4 व्हर्जन ऐवढीच आहे. कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन 90hp ची ऊर्जा आणि 110Nm टॉर्क निर्माण करते. बीएस6 मध्ये कारचा मायलेज कमी झाला आहे. बीएस4 व्हर्जनमध्ये इंजिनचा मायलेज मॅन्युअल गिअरबॉक्ससह 19.5 किलोमीटर आणि सीव्हीटी गिअरबॉक्समध्ये 19 किलोमीटर प्रतिलिटर होता. तर बीएस6 व्हर्जनमध्ये अनुक्रमे 18.6 किलोमीटर आणि 18.3 किलोमीटर प्रतिलिटर झाला आहे.