17 January 2021

News Flash

बंद होतेय ‘होंडा’ची लोकप्रिय बाईक, ‘हे’ आहे कारण

होंडाच्या देशभरातील बहुतांश डिलर्सनी या बाईकचा स्टॉक उपलब्ध नसल्याचं सांगितलं

होंडा टू-व्हिलर्स इंडियाने आपली लोकप्रिय बाईक Honda cb unicorn 160 चं भारतातील उत्पादन बंद केल्याचं वृत्त आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर ही बाईक अद्याप सीबीएस प्रकारात उपलब्ध असल्याचं दिसतंय मात्र अजूनही कंपनीने ही बाईक नव्या नियमांनुसार  आवश्यक असलेल्या एबीएस फीचरसह अपग्रेड केलेली नाही. परिणामी कंपनी ही बाईक बंद करण्याच्या विचारात असण्याची  शक्यता आहे. अशातच होंडाच्या देशभरातील बहुतांश डिलर्सनी आपल्याकडे या बाईकचा स्टॉक नसल्याचं सांगितलं, तसंच ग्राहक देखील आता या बाईकची मागणी करत नाहीत असं सांगितलं. फायनान्शिअल टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

या वृत्तानुसार, आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या वर्षभरात unicorn 160 च्या केवळ 13 हजार 266 युनिट्सची विक्री झाली आहे. म्हणजे एका महिन्यात अवघ्या 1 हजार बाईक्सची विक्री झाली. त्यामुळे कंपनीने unicorn 160 चं उत्पादन थांबवलं असल्याची चर्चा आहे. थोड्याच दिवसात ही बाईक कंपनीच्या संकेतस्थळावरुन देखील हटवली जाणार असल्याची माहिती आहे. पण कंपनीने याबाबत अधिकृत माहिती अद्याप दिलेली नाही.

Unicorn 150 ची डिमांड –

सध्या बाजारात Unicorn 160 ला अत्यल्प प्रतिसाद मिळत असला तरी Unicorn 150 ची डिमांड दिवसेंदिवस वाढतेय. मे महिन्यात कंपनीने युनिकॉर्न 150 च्या जवळपास 27,000 युनिट्सची विक्री केली. विशेष म्हणजे या बाईकच्या किंमतीत कंपनीने 7 हजार रुपयांची वाढ करुनही ग्राहकांकडून या बाईकची मागणी कमी झालेली नाही. Honda CB Unicorn 150 ABS ची दिल्ली एक्स-शोरुम किंमत 78 हजार 815 रुपये आहे, तर नॉन-एबीएस व्हेरिअंटची किंमत 72 हजार 315 रुपये आहे. याशिवाय, कंपनीने मे महिन्यात आपल्या ‘एक्स-ब्लेड’ या दुसऱ्या स्टायलिश बाईकच्या 4 हजारापेक्षा अधिक युनिट्सची विक्री केली, तर ‘हॉर्नेट’च्या 2 हजार 600 हून अधिक युनिट्सची विक्री झाली. या दोन्ही बाईकच्या पुढील चाकाला कंपनीने ABS फीचर दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आता नव्या मॉडल्सवर काम करत असून या वाहनांची बीएस-6 आणि सुरक्षिततेच्या नव्या मानकांनुसार निर्मिती केली जाणार आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 4:46 pm

Web Title: honda cb unicorn 160 production stopped discontinued in india sas 89
Next Stories
1 पावसाळी ट्रेकला जाताना ‘ही’ काळजी नक्की घ्या!
2 रात्री 11.30 ते सकाळी 6 पर्यंत WhatsApp बंद? महिन्याला 499 रुपये? जाणून घ्या सत्य
3 ‘शाओमी’चा स्वस्त स्मार्टफोन Redmi 7A लाँच, जुलैमध्ये खरेदी केल्यास स्पेशल ऑफर
Just Now!
X