News Flash

Honda CB300R च्या किंमतीत बदल, पहिल्या तीन महिन्यांतच झाली होती ‘सोल्ड आउट’

फेब्रुवारी महिन्यात लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत बदल केलाय

दुचाकी बनवणारी दिग्गज कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया’ने आपल्या Honda CB300R या बाइकच्या किंमतीत बदल केला आहे. फेब्रुवारी महिन्यात लाँच झाल्यानंतर पहिल्यांदाच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे. या बाइकच्या किंमतीत कंपनीने 989 रुपयांची वाढ केली आहे. लाँच होताच या बाइकला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळाला होता आणि बाइक तीन महिन्यांपर्यंत सोल्ड आउट झाली होती. या बाइकमुळे कंपनीच्या CBR250R बाइकच्या विक्रीत लक्षणीय घट झाली होती.

या बाइकमध्ये 6 स्पीड ट्रांसमिशनसह 286सीसीचं DOHC 4 वॉल्व लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. नियो स्पोर्ट्स कॅफे बाइकच्या प्रेरणेतून या नव्या बाइकला डिझाइन करण्यात आलं आहे, तसंच अल्ट्रा मॉडर्न लुक देखील देण्याचा प्रयत्न कंपनीने केलाय. म्हणजेच रेट्रो आणि मॉडर्न असं समीकरण या बाइकमध्ये आहे. यात एबीएस फीचरसह 296mm चा डिस्क ब्रेक आहे. Matte Axis Gray Metallic आणि Candy Chromosphere Red या दोन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध आहे.

फीचर्स –
सीटची उंची 779 एमएम आणि कर्ब वेट 143 किलोग्राम
फ्युअल टँक -10 लीटर
बाइकमध्ये 296 एमएमचा फ्रंट डिस्क आणि 220 एमएम रिअर डिस्कसह ड्युअल चॅनल एबीएस
सस्पेंशनसाठी पुढील बाजूला 41 एमएम इन्व्हर्टेड फॉर्क्स आणि 7-स्टेप अॅड्जस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन
ट्युब्यूलर टायर, ट्युब्यूलर स्टील फ्रेम, स्टील प्लेट स्विंगआर्म, स्पोर्ट्स अपसाइड फ्रंट फोर्क्स

किंमत –
989 रुपयांची वाढ झाल्याने या बाइकची एक्स-शोरुम किंमत आता 2.42 लाख रुपये झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2019 4:09 pm

Web Title: honda cb300r price hiked know all specifications and price sas 89
Next Stories
1 Benelli Leoncino 500 भारतात लाँच, 10 हजारांत बुकिंग सुरू
2 Hyundai ची नवीन Grand i10 Nios, केवळ 11 हजार रुपयांत करा बुकिंग
3 Honor च्या ‘स्मार्ट स्क्रीन टीव्ही’ला शानदार प्रतिसाद , लाँचिंगपूर्वीच 1 लाखांहून अधिक बुकिंग
Just Now!
X