News Flash

Honda ने लाँच केली अ‍ॅडव्हेंचर बाइक CB500X, प्रीमियम बाइकची खासियत काय आणि किंमत किती?

'पॅरेलल-ट्विन इंजिन'मध्ये आली होंडाची 'अ‍ॅडव्हेंचर टूरर' बाइक CB500X...

‘होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया’ने भारतात आपल्या प्रीमियम बाइक रेंजचा विस्तार करताना Honda CB500X ही नवीन बाइक लाँच केली आहे. ही कंपनीची नवीन ‘अ‍ॅडव्हेंचर टूरर’ बाइक असून होंडाने यात पॅरेलल-ट्विन इंजिन दिलं आहे.

इंजिन आणि स्पेसिफिकेशन्स :-
Honda CB500X मध्ये कंपनीने पॉवरसाठी 417cc, 8-वॉल्व, लिक्विड-कूल्ड पॅरेलल ट्विन इंजिन दिलं आहे. हे इंजिन 8500 आरपीएमवर 47 bhp पॉवर आणि 6500 आरपीएमवर 43.2Nm पीक टॉर्क निर्माण करतं. यात असिस्ट/स्लिपर क्लचसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आहे. याशिवाय बाइकमध्ये ESS अर्थात इमर्जन्सी स्टॉप सिग्नल या तंत्रज्ञानाचाही पर्याय कंपनीने दिला आहे. याशिवाय सेमी-फेयरिंग डिझाइन, मोठी विंडस्क्रीन, फुल-एलईडी लायटिंग, निगेटिव्ह एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, सिंगल पीस सीट आणि अ‍ॅलॉय व्हील असे अनेक फिचर्स या बाइकमध्ये आहेत. तसेच, ड्युअल-चॅनल ABS आणि होंडा इग्निशन सिक्युरिटी सिस्टिम यांसारखे फीचर्सही Honda CB500X मध्ये कंपनीने दिलेत.

टक्कर कोणाशी ?
भारतीय बाजारात ही बाइक कावासाकी वर्सेस 650, सुझुकी व्ही-स्ट्रॉम 650 एक्सटी (Kawasaki Versys 650, Suzuki V-Strom 650 XT,) आणि बेनेली टीआरके 502 (Benelli TRK 502) यांना टक्कर देईल.

किंमत किती?
अत्यंत आकर्षक लूक असलेल्या Honda CB500X या बाइकची एक्स-शोरुम किंमत 6 लाख 87 हजार 386 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्रँड प्रिक्स रेड आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटालिक अशा दोन रंगांचे पर्याय या बाइकसाठी आहेत. कंपनीच्या वेबासाइट किंवा डीलरशीपमधून बाइकसाठी बूकिंग करता येईल. होंडाच्या बिगविंग (BigWing) डीलरशिप नेटवर्कद्वारे या बाइकची विक्री होईल. ‘बिगविंग’ ही कंपनीची प्रीमियम डीलरशिप साखळी असून इथून Honda H’Ness CB 350 आणि Honda H’Ness CB 350 यांसारख्या प्रीमियम बाइक्सची विक्री होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 4:08 pm

Web Title: honda cb500x launched in india check price specifications and all other details sas 89
Next Stories
1 १० हजारांपेक्षा कमी किंमतीत शानदार फिचर्स, ‘मोटोरोला’च्या स्वस्त स्मार्टफोनचा आज पहिलाच Sale
2 ‘बजेट’ स्मार्टफोन Redmi Note 10 चा आज पहिलाच Sale, काय आहे खासियत?
3 Reliance Jio : 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 56GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ऑफर्स
Just Now!
X