करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने ग्राहकांना सोयीस्कर खरेदीचा अनुभव देण्यासाठी देशातील आघाडीची ऑटो कंपनी, होंडा कार्स इंडिया लिमीटेडने (HCIL) ‘होंडा फ्रॉम होम’ या ऑनलाइन बूकिंग प्लॅटफॉर्मची सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता ग्राहकांना डीलरशिपमध्ये न जाता घरबसल्या आपली आवडती कार खरेदी करता येणार आहे. हा प्लॅटफॉर्म ग्राहकांना त्यांची आवडती डीलरशीप निवडणे आणि ऑनलाइन त्यांची कार बूक करणे यांचा पर्याय उपलब्ध करून देतो.

या डीजिटल प्लॅटफॉर्मद्वारे ग्राहक त्यांच्या कारची बूकिंग डीलरशीपला भेट न देता त्यांच्या घरून आरामात करू शकतात. “आमची नवीन ‘होंडा फ्रॉम होम’ सुविधा ग्राहकांना ऑनलाइन खरेदीचा सोपा आणि सुरक्षित अनुभव देते. ग्राहक आता सोयीस्करपणे त्यांची होंडा कार त्यांच्या घरूनच बूक करू शकतात. हा प्लॅटफॉर्म होंडाच्या डीजिटलीकरणाचा एक भाग आहे, ” अशी प्रतिक्रिया यावेळी होंडा कार्स इंडिया लिमीटेडचे विक्री आणि विपणनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक राजेश गोयल यांनी दिली.

कशी बूक कराल होंडाची कार ? –
– http://www.hondacarindia.com ला लॉग ऑन करा
– बूक नाऊ हा पर्याय निवडा
– मॉडेल निवडा
– तुमची डीलरशीप निवडा
– तुमची माहिती द्या
– ऑनलाइन बूक करा आणि पेमेंट करा
– एकदा बूकिंग झाल्यानंतर डीलरशीपद्वारे ग्राहकाला संपर्क साधून पेमेंट आणि विक्रीची अन्य प्रकिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर           ग्राहकाच्या मागणीनुसार खरेदी केलेल्या कारची होम डिलिव्हरीची व्यवस्थाही केली जाईल.