Honda ने काही दिवसांपूर्वीच भारतीय बाजारात नवीन ‘आफ्रिका ट्विन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स बाइक’ लाँच केलीये. आता कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध असलेली आपली 500सीसी क्षमतेच्या बाइक्सची रेंज भारतीय बाजारत लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय बाजारात चार शानदार बाइक आणणार असल्याची माहिती असून यामध्ये Rebel 500, CB500X, CBR500R आणि CB500F या बाइक्सचा समावेश आहे.

(आणखी वाचा –  ‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट आली, ‘रॉयल एनफील्ड’ची Classic 350 लाँच झाली)

या चारही नव्या मोटरसायकलमध्ये Rebel 500 क्रूझर बाइक, CB500X अ‍ॅडव्हेंचर टूअर बाइक, CBR500R फुल-फेअर्ड स्पोर्ट्स बाइक आणि CB500F नेकेड बाइक आहेत. रिबेल 500 बाइकमध्ये 471cc, पॅरेलल-ट्विन सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 8,500 rpm वर 45bhp ची पावर आणि 6,000 rpm वर 44.6Nm टॉर्क निर्माण करते. होंडाच्या 500सीसी रेंजच्या तीन अन्य बाइकमध्येही रिबेल 500 प्रमाणे इंजिन असेल, पण तिन्ही इंजिनचे आउटपुट वेगवेगळे असेल. तिन्ही बाइक, म्हणजे CBR500R, CB500F आणि CB500X मध्ये असणारे 471cc क्षमतेचं हे इंजिन 8,600 rpm वर 47bhp पावर आणि 6,500 rpm वर 43Nm टॉर्क निर्माण करते. होंडाच्या या चारही बाइक एकाच प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्या आहेत. यातील रिबेल 500 ही कंपनीची भारतातील पहिली क्रूझर बाइक असेल. तर, CB500X होंडाची देशातील सर्वात स्वस्त अ‍ॅडव्हेंचर टूअर मोटरसायकल असेल. सध्या भारतीय बाजारात होंडाकडे CB300R आणि CBR650R या दोन्ही बाइक्सच्या मधील सेगमेंटमध्ये एकही बाइक उपलब्ध नाहीये. या चार बाइक्सद्वारे ते सेगमेंट आकर्षक करण्याचा कंपनीचा प्रयत्न असून याचा मार्केटमध्ये फायदा होईल असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.

(आणखी वाचा – Pulsar ला टक्कर, Hero ने आणली ‘झकास’ बाइक )

किंमत :-
होंडाच्या या चारही बाइक्सच्या किंमताचा खुलासा लाँचिंगवेळीच केला जाणार आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रिबेल 500 ची किंमत 4.5 लाख रुपयाच्या जवळपास असू शकते. तर, CBR500R ची किंमत 5 लाख आि CB500F ची किंमत जवळपास 4.8 लाख रुपये असू शकते. याशिवाय, Honda CB500X ची किंमत 5.5 लाख रुपयांच्या आसपास राहू शकते.

(आणखी वाचा –  ‘सर्वात स्वस्त’ BS6 बुलेट आली, ‘रॉयल एनफील्ड’ची Classic 350 लाँच झाली)

(आणखी वाचा: आली Honda ची ‘पॉप्युलर’ बाइक, आता एकाच व्हर्जनमध्ये होणार विक्री?)

(आणखी वाचा: आली ‘हीरो’ची Super बाइक, आधीपेक्षा जास्त पावरफुल-ग्राउंड क्लिअरंसही वाढला)

(आणखी वाचा: पुण्यातून झालीये विक्रीला सुरूवात, पण बजाजची Chetak धावेचना…)