होंडाची प्रीमियम बाइक Honda X-Blade आता महाग झाली आहे. होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) गेल्या महिन्यातच ही बाइक बीएस-6 इंजिनमध्ये लाँच केली होती. आता लाँचिंगच्या एका महिन्यामध्येच कंपनीने या बाइकच्या किंमतीत वाढ केली आहे.

Honda X-Blade फीचर्स :-
कंपनीने या बाइकला शार्प आणि स्पोर्टी लूक दिलं आहे. बाइकच्या फ्रंटमध्ये रोबो-स्लाइल्ड ऑल-एलईडी हेडलॅम्प आहेत. याशिवाय पेट्रोल टाकीवर नवीन डायनॅमिक ग्राफिक्स, ड्युल आउटलेट मफलर, चंकी ग्रॅब रेल्स, शार्प ऐज साइड कव्हर्स, ब्लॅक फ्रंट फॉर्क कव्हर, LED टेललॅम्प आणि हॅजर्ड स्विच यांसारखे अनेक फीचर्स आहेत. याशिवाय Honda X-Blade बाइकमध्ये इंस्ट्रूमेंट क्लस्टरबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये ऑल-डिजिटल युनिट आहे. यात गिअर पोझिशन इंडीकेटर, सर्व्हिस ड्यू इंडीकेटर आणि क्लॉक आहे. बीएस-6 इंजिनच्या Honda X-Blade बाइकमध्ये 17 इंच अॅलॉय व्हील्स आहेत. रिअर मोनोशॉक सस्पेन्शनसह बाइकच्या पुढील बाजूला कन्व्हेन्शनल टेलीस्कोपिक फोर्क्स आहेत.

Skoda Superb returns to India
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, ९ एअरबॅगसह वर्षभरात पुन्हा एकदा ‘ही’ कार नव्या अवतारात दाखल, किंमत…
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Lok Sabha Election 1952 First Vote, First Ballot Box History in Marathi
पहिल्या-वहिल्या मतपेट्यांची कहाणी; ७० वर्षांपूर्वी मुंबईत झालं होतं विक्रमी उत्पादन, ‘या’ कंपनीकडे दिली होती जबाबदारी!
IL and FS, NCLT Approval, Sell Shares, Insolvent Companies, Without Shareholders approval, finance, share,
दिवाळखोर कंपन्यांतील हिस्सा विक्रीस मंजुरी द्या, आयएल अँड एफएसची राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाकडे मागणी

Honda X-Blade इंजिन :-
होंडाच्या या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्ससोबत 162.7cc, सिंगल सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 13.5hp पॉवर आणि 14.7Nm पीक टॉर्क निर्माण करतं. इंजिनमध्ये फ्युअल इंजेक्शन सिस्टिम आहे. अपडेटेड एक्स-ब्लेडमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) असून 12 लिटर इतकी पेट्रोल टाकीची क्षमता आहे.

Honda X-Blade नवीन किंमत :-
Honda X-Blade या बाइकची एक्स-शोरुम किंमत गेल्या महिन्यात 1,05,325 रुपये होती. पण आता किंमतीत वाढ झाल्याने या बाइकची (एक्स-शोरुम) किंमत 1,06,027 रुपये झाली आहे. होंडाने X-Blade बाइकच्या किंमतीत 702 रुपयांची वाढ केली आहे. तर, Honda X-Blade ड्युअल डिस्क व्हेरिअंटची किंमत 1,10,308 रुपये आहे.

(क्रेटा-सेल्टॉसच्या Turbo पेक्षा 5 लाखांनी ‘स्वस्त’! लाँच झाली ‘पॉवरफुल’ Renault Duster Turbo)

( OFFER : देशातील सर्वात स्वस्त फॅमिली कार अजून स्वस्तात खरेदी करण्याची संधी)

(Scorpio, बोलेरो… ! महिंद्राच्या SUV वर तीन लाखांपर्यंत बंपर डिस्काउंट)