19 July 2019

News Flash

‘होंडा’ची नवीन Amaze, किंमत 7.89 लाखांपासून सुरू

पेट्रोल कारचा मायलेज 19.5 किलोमीटर प्रतिलिटर, तर डिझेल कारचा मायलेज 27.4 किलोमीटर प्रतिलिटर असल्याचा कंपनीचा दावा

Honda च्या नव्या Amaze कारच्या एक लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. एक लाख विक्रीचा आकडा पार केल्यामुळे कंपनीने हा आनंद साजरा करण्यासाठी Amaze कारची एक विशेष आवृत्ती लाँच केली आहे.

Honda Amaze Ace या नावाने लाँच झालेल्या या कारची किंमत 7.89 लाख ते 9.72 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही प्रकारांमध्ये ही कार बाजारात उतरवण्यात आली आहे. या नव्या आवृत्तीमध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहेत. यात स्टायलिश ब्लॅक अॅलॉय व्हिल्स, स्पोर्टी ब्लॅक स्पॉइलर, ऐस आवृत्तीच्या ब्रँडिंगसह सीट कव्हर, फ्रंट रूम लँप, ब्लॅक डोर वायजर, डोर एज गार्निश आणि मागील बाजूला ऐस आवृत्तीचं बॅज आहे. ही नवीन कार रेड, सिल्वर आणि व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे.

या कारमध्ये 90ps पावर आणि 1.2-लिटर क्षमतेचं पेट्रोल इंजिन आणि 100ps पावर व 1.5-लिटर क्षमतेचं डिझेल इंजिन आहे. दोन्ही इंजिनसह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे. पेट्रोल इंजिन असलेली कारचा मायलेज 19.5 किलोमीटर प्रतिलिटर आणि डिझेल इंजिन असलेल्या कारचा मायलेज 27.4 किलोमीटर प्रतिलिटर आहे, असा दावा कंपनीने केला आहे.

First Published on June 18, 2019 12:40 pm

Web Title: hondas amaze ace edition launched in india sas 89