Honor 20 या स्मार्टफोनसाठी आज भारतात पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लिपकार्ट या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल सुरू होईल. याशिवाय काही प्रमूख ऑफलाइन स्टोअर्समध्येही या फोनची विक्री केली जाईल. या महिन्याच्या सुरूवातीलाच कंपनीने भारतात ‘ऑनर 20 प्रो’, ‘ऑनर 20’ आणि ‘ऑनर 20 आय’ हे तीन फोन लाँच केले होते. यातील Honor 20i ची भारतात विक्री सुरू झाली आहे, तर Honor 20 Pro ची विक्री केव्हा सुरू होणार याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मिडनाइट ब्लॅक आणि सफायर ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.

ऑफर्स –  कंपनीने या फोनच्या खरेदीवर ‘Love it or Return it’ असं चॅलेंज ठेवलं आहे. याअंतर्गत 90 दिवस वापरुन देखील फोन न आवडल्यास ग्राहक फोन परत करु शकणार आहे. 90 दिवसांमध्ये फोन परत केल्यास किंमतीच्या 90 टक्के पैसे परत दिले जातील. याशिवाय रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी 2200 रुपये इंस्टंट कॅशबॅक आणि 125 जीबी अतिरिक्त डाटा मिळेल.

फीचर्स – ‘ऑनर 20’मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात सोनी आयएमएक्स 586 सेंसरसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आहे. याशिवाय फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, त्यासोबत 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसिंग सेंसर आणि मॅक्रो लेंससोबत एक 2 मेगापिक्सल कॅमेरा. सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ऑनर 20 मध्ये 6.26 इंच फुल एचडी+ पंच होल डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 9 पायवर आधारीत मॅजिक युआय 2.1.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 7nm Kirin 980 AI प्रोसेसर आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या या फोनला मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट देण्यात आलेला नाहीये. फोनमध्ये 3,750mAh ची बॅटरी देण्यात आली असून कमी वेळेत चार्ज व्हावा यासाठी यात 22.5 वॉट क्षमतेचं ऑनर सुपर चार्ज तंत्रज्ञान आहे.

किंमत – Honor 20 च्या 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 32 हजार 999 रुपये आहे.