Huawei ची सबब्रँड कंपनी Honor ने काही दिवसांपूर्वीच आपल्या ‘Honor 20i’ या स्मार्टफोनसाठी ‘फँटम रेड कलर लिमिटेड एडिशन’ ही नवी आवृत्ती लाँच केली होती. या स्मार्टफोनसाठी आज सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी १२ वाजेपासून या फोनच्या विक्रीसाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर सेल आहे.

ऑफर्स – सेलमध्ये या फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्स देखील आहेत. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के सवलत आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ५ टक्के सवलतीची ऑफर आहे. तसंच आयसीआयसीआयच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डधारकांना १० टक्के डिस्काउंटची ऑफर आहे. याव्यतिरिक्त अॅमेझॉनच्या संकेतस्थळावरुन खरेदी केल्यास एसबीआयच्या कार्डधारकांना १० टक्के सवलत आणि नो कॉस्ट इएमआयचा पर्याय आहे. तसंच ६ हजार रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे.

फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. मागील बाजूला आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यात २४ मेगापिक्सल, ८ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असे कॅमेरे आहेत. कॅमेऱ्यामध्ये एन्टी शेक, सुपर स्लो-मोशन व्हिडिओ शुटिंग, प्रोफेशनल मोड, पोट्रेट मोड यासारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असे विविध फीचर्स आहेत. फोनमध्ये किरीन ७१० एसओसी प्रोसेसर आहे. फोममध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल मेमरी आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी आणखी वाढवू शकता. त्याशिवाय ‘Honor 20i’मध्ये ३४०० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. फोनमध्ये रिअर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर असून फेस अनलॉकची सुविधा आहे.

किंमत –
४ जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये इतकी असून मिडनाइट ब्लॅक, फँटम ब्ल्यू आणि फँटम रेड या रंगांमध्ये हा फोन खरेदी करता येईल.