News Flash

4,000mAh ची बॅटरी आणि ड्यूअल कॅमेरा, Honor 8C भारतात लाँच

कंपनीने यासोबत फिटनेस बँड Honor Band 4 देखील लाँच केला आहे

4,000mAh ची बॅटरी आणि ड्यूअल कॅमेरा, Honor 8C भारतात लाँच

स्मार्टफोन निर्माती Huawei कंपनीचा नवा स्मार्टफोन Honor 8C लाँच झाला आहे. कंपनीने यासोबत फिटनेस बँड Honor Band 4 देखील लाँच केला आहे. यापूर्वीचा Honro 7C या स्मार्टफोनची ही पुढील आवृत्ती आहे. किंमतीच्या बाबतीत नुकत्याच ल़ाँच झालेल्या Realme U1 स्मार्टफोनला याद्वारे टक्कर मिळण्याची शक्यता आहे.

Honor 8C च्या 4GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे. तर, 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये ठेवण्यात आलीये. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येऊ शकते. ऑरोरा ब्ल्यू, मॅजिक नाइट ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड आणि नेब्यूला पर्पल या चार कलर्समध्ये हा फोन उपलब्ध असेल. 10 डिसेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात होत आहे. केवळ अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर आणि HiHonor च्या स्टोअर्समध्ये हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

फिचर्स –
-4,000mAh क्षमतेची बॅटरी
-मेटल बॉडी
-आर्टिफिशियल इंटेलिजेंससह 13 आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप(एलईडी फ्लॅश)
-सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल कॅमेरा (सॉफ्ट फ्लॅश)
-ओएस – अँन्ड्रॉइड 8.1 ओरियो
-डिस्प्ले – 6.26 इंच
-प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन ऑक्टाकोर 626 प्रोसेसर
-कनेक्टिव्हिटी, 4G VoLTE, जीपीएस, मायक्रो युएसबी पोर्ट आणि 3.5mm जॅक
-मागील बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2018 3:48 pm

Web Title: honor 8c launched in india
Next Stories
1 Realme U1 भारतात लाँच, तब्बल 25 मेगापिक्सल्सचा कॅमेरा आणि बरंच काही
2 या ‘हटके’ अभ्यासक्रमांसाठीही शैक्षणिक कर्ज!
3 तापमानवाढीचा कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम
Just Now!
X