20 January 2019

News Flash

चार कॅमेरे असणारा ‘हा’ स्मार्टफोन लवकरच बाजारात येतोय

केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार

ऑनर ९ लाईट

हुवाई कंपनीने ऑनरचा आणखीन एक नवीन फोन लवकरच भारतीय बाजारांमध्ये दाखल करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच ऑनर व्ह्यू टेन हा फोन बाजारात आणल्यानंतर आता १७ जानेवारी रोजी कंपनी ऑनर ९ लाईट हा फोन लॉन्च करणार आहे. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनमध्ये चक्क चार कॅमेरे देण्यात आले आहेत. तसेच या फोनचे डिझाइनही आकर्षक असून हा फोन भारतामध्ये केवळ फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकत घेता येईल.

डिसेंबर महिन्यात चीनमध्ये लॉन्च झालेला हा फोन कंपनी मिडीयम रेंज स्मार्टफोन म्हणून बाजारात उतरवणार आहे. ऑनर ९ लाईटची स्क्रीन ५.६ इंचाची असून त्याला आय़पीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ३ जीबी रॅम आणि ४ जीबी रॅम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. तर इंटरनल स्टोरेजमध्येही ३२ जीबी आणि ६४ जीबी असे दोन पर्याय ग्राहकांना देण्यात आले आहेत. हा फोन किरिन ६५९ प्रोसेसरवर काम करेल. हा फोन अँड्रॉईडच्या नवीन व्हर्जनवर म्हणजेच अँड्रॉईड ओरियो ८.०वर काम करेल. या फोनमध्ये ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

चार कॅमेरे

या फोनमध्ये दोन फ्रण्ट आणि दोन रेअर कॅमेरा असे एकूण चार कॅमेरे देण्यात आले आहेत. या फोनचे हे खास फिचर आहे. फ्रण्टपैकी एक १३ मेगापिक्सल तर दुसरा दोन मेगापिक्स कॅमेरा असेल तर रेअर कॅमेरांची रचनाही अशीच असणार आहे.

किंमत

हा फोन मागील महिन्यात चीनमध्ये लॉन्च झाला असून तिथे त्याच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत एक हजार १९९ युआन (चीनी चलन) म्हणजेच ११ हजार ५०० रुपयांहून थोडी अधिक आहे तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरन स्टोरेज असणारा फोन जवळपास १७ हजार ५०० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे भारतातही या फोनची किंमत जास्तीत जास्त २० हजारांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरी कंपनीकडून फोनच्या किंमतीबद्दल कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आली नसल्याने यासंदर्भात १७ तारखेलाच निश्चित माहिती मिळेल.

First Published on January 12, 2018 10:41 am

Web Title: honor 9 lite with four cameras and stunning design coming soon in india