03 March 2021

News Flash

स्वस्त Honor 9S खरेदी करण्याची आज संधी, किंमत 7000 पेक्षा कमी

सेलमध्ये आकर्षक ऑफर्स

स्वस्त व कमी बजेटमधील Honor 9S या स्मार्टफोनचा आज(दि.21) सेल आहे. कंपनीने 31 जुलै रोजी हा फोन भारतात लाँच केला होता. आज दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये या फोनच्या खेरदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत.

ऑफरनुसार एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे Honor 9S  खरेदी करणाऱ्यांना 5 टक्के कॅशबॅकची ऑफर मिळेल. तसेच,  Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर आणि Axis Bank Buzz क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांनाही 5 टक्के सवलत मिळेल. याशिवाय दर महिन्याला 723 रुपये नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांना मिळेल .

Honor 9S हा फोन 2जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. 32 जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये डेडिकेटेड माइक्रोएसडी कार्ड स्लॉट दिला आहे. याद्वारे स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.  हा फोन ब्लू आणि ब्लॅक अशा दोन रंगात खरेदी करता येईल. ऑनरच्या या स्मार्टफोनमध्ये 5.45 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 Magic UI 3.1 वर आधारित या फोनमध्ये  MediaTek Helio P22 प्रोसेसर दिला आहे. Honor 9S फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरऐवजी Huawei’ची अॅपगॅलरी मिळते. Honor 9S  फोनच्या मागील बाजूला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. याशिवाय 3020mAh बॅटरी यात आहे.

किंमत : 6 हजार 499 रुपये इतकी या फोनची किंमत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 10:52 am

Web Title: honor 9s with 32 gb internal storage will go on sale via flipkart check price and offers sas 89
Next Stories
1 ‘या’ स्टार्टअपने ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप’ स्पर्धेत मारली बाजी, सरकारने केली निवड
2 स्वस्त झाला Samsung चा ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षाही कमी
3 नोकरी शोधणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, Google ने भारतात लाँच केलं ‘स्पेशल App’
Just Now!
X