स्मार्टफोन निर्माती कंपनी Honor ने भारतात आपल्या X-सीरिजअंतर्गत नवा स्मार्टफोन Honor 9X लाँच केलाय. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे 48 मेगापिक्सल सेंसरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे. Honor कंपनीची X-सीरिज भारतात सर्वाधिक लोकप्रिय सीरिज आहे.

Honor 9X किंमत आणि ऑफर :
हा स्मार्टफोन दोन व्हेरिअंट 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असेल. फोनच्या 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. १९ जानेवारी रोजी या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर सेलचं आयोजन करण्यात आलंय. ICICI आणि Kotak Mahindra बँकेच्या कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. याशिवाय सेलच्या पहिल्या दिवशी फोनच्या 4जीबी व्हेरिअंटवर एक हजार रुपयांची सवलतही मिळेल.

आणखी वाचा – शाओमीचा ‘सर्वात पावरफुल स्मार्टफोन’ स्वस्तात खरेदी करण्याची संधी

Honor 9X फीचर्स :
यामध्ये 6.59 इंच फुल व्ह्यू डिस्प्ले आहे. कंपनीने फोनच्या डिझाइनसाठी विशेष मेहनत घेतलीये. यामध्ये ड्युअल 3D कर्व्ह्ड बॅक पॅनल, 3.5mm हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सफायर ब्लू आणि मिडनाइट ब्लॅक हे दोन रंगांचे पर्याय फोनसाठी आहेत. याशिवाय या फोनमध्ये ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710F प्रोसेसर मिळेल. हा फोन ऑनरच्या X-सीरिजचा पहिलाच फोन आहे ज्यामध्ये 48 MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आणि 8 मेगापिक्सल वाइड-अँगल सेंसर मिळतो. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेराही आहे. तसेच फोनमध्ये 4,000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल.