20 November 2019

News Flash

Honor Days Sale : मोबाइल खरेदीवर15 हजारापर्यंत डिस्काउंट

आजपासून 29 जूनपर्यंत हा सेल सुरू

Honor कंपनीच्या स्मार्टफोनसाठी Amazon च्या संकेतस्थळावर Honor Days सेल सुरू झाला आहे. आजपासून 29 जूनपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. पाच दिवसांच्या या सेलमध्ये ऑनरच्या स्मार्टफोन खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंतचं भरघोस डिस्काउंट दिलं जात आहे.

या सेलमध्ये ऑनर 8 सी, ऑनर व्ह्यू 20, ऑनर 9एन, ऑनर 8 एक्स, ऑनर 10 लाइट आणि ऑनर प्ले यांसारख्या फोनवर सवलत आहे. मूळ किंमत 12 हजार 999 रुपये असलेल्या ऑनर 8 सी या फोनवर 4000 रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे हा फोन 8 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. ऑनर 8 एक्स या फोनवर पाच हजार रुपयांची सवलत आहे. त्यामुळे यातील 4 जीबी व्हेरिअंटचा फोन 12 हजार 999 रुपये आणि 6 जीबी व्हेरिअंटचा फोन 14 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.

याशिवाय ऑनर व्ह्यू 20 या स्मार्टफोनवर तब्बल 15 हजार रुपयांची सवलत आहे. त्यामुळे या फोनचं 8 जीबी व्हेरिअंट 35 हजार 999 रुपये, तर 6 जीबी व्हेरिअंटवरही 13 हजार रुपयांची सवलत मिळेल. ऑनर 9 एन या फोनवर नऊ हजार रुपयांची सवलत आहे. हा फोन सेलमध्ये 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर यातील अन्य व्हेरिअंट अनुक्रमे 10 हजार 999 रुपये, 15 हजार 999 रुपये आणि 19 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येतील. याशिवाय ऑनर प्ले हा स्मार्टफोन 8 हजार रुपयांच्या सवलतीसह 13 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल.

First Published on June 25, 2019 4:58 pm

Web Title: honor days sale on amazon india website know all offers sas 89
Just Now!
X