News Flash

पाणी कधी प्यावे ?

हे नियम ठरु शकतात आरोग्यदायी

पृथ्वीचा सर्वाधिक भाग ज्याप्रमाणे पाण्याने व्यापलेला आहे त्याचप्रमाणे शरीराच्याही अधिक भागात पाणी असते. पाण्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. शरीराची सफाई करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपण दिवसभरात जितके पाणी पिऊ तितके चांगलेच असते. सामान्यपणे प्रत्येकाने दिवसभरात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र हे पाणी कसे आणि दिवसातील कोणत्या वेळेस प्यायलेले चांगले हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
१. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे शरीर चांगल्या पद्धतीने साफ होण्यास फॅटस कमी होण्यास मदत होते.

२. पाणी उभे राहून पिणे चांगले नाही. बसून प्यावे.

३. एकाचवेळी खूप पाणी पिऊ नये. दर थोडा वेळाने दोन ते तीन घोट पाणी प्यावे.

४. आंघोळ झाल्यावर दररोज १ ग्लास पाणी प्यावे. आंघोळीने काही वेळा थकल्यासारखे होते. तसेच ब्लडप्रेशरची तक्रार उद्भवत नाही.

५. जेवणानंतर लगेच पाणी न पिता जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यावे. यामुळे पचनशक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय जेवणानंतर अर्धा ते पाऊण तासाने पाणी प्यावे .

६. झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने हृदयरोगापासून सुटका मिळू शकते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2017 10:30 am

Web Title: how and when to drink water
Next Stories
1 कर्करोगाला मारक तांदळाचे वाण विकसित
2 मिनरल वॉटरच्या बाटल्यांचा पुनर्वापर करताय? मग हे जरूर वाचा
3 स्मोकिंग सोडायचंय, मग हे घरगुती उपाय करा!
Just Now!
X