News Flash

मारा ‘व्हिडिओ पोस्ट’चा…!

सामान्य युजरदेखील व्हिडिओच्या माध्यामातून व्यक्त होऊ लागला.

Facebook (Photo: Dreamstime)

मानवाच्या आयुष्यात क्रांती घडविणारा गेल्या काही वर्षातील घटक म्हणजे ‘इंटरनेट’. इंटरनेटमुळे काही गोष्टींच्या वापरात बदल झाला अथवा काही काळाच्या पडद्याआड गेल्या. जिथे लोकं बातम्या, माहिती अथवा मनोरंजन इत्यादींसाठी वृत्तपत्र, मासिकं अथवा टिव्ही वाहिन्यांवर अवलंबून होती, तिथे इंटरनेटचा वापर होऊ लागला. पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी नवीन पर्याय उपलब्ध झाले. मनोरंजन, बँकिंग, शिक्षण, हॉटेल, संपर्क, माध्यमक्षेत्र अशा विविध क्षेत्रात इंटरनेटमुळे क्रांती घडून आली. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने विदेशातील शौक्षणिक संधी शोधणे, नोकरी शोधणे, आपल्याला माहित असलेल्या अथवा आवडत्या विषयावर ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त होणे, एखादी माहिती हवी असल्यास सर्च इंजिनच्या माध्यमातून त्याचा शोध घेणे, चॅटिंग आणि इमेल करण्यासाठी अधिक प्रमाणावर वापर होत असे. कालांतराना ‘सोशल मीडिया’ने शिरकाव केला आणि इंटरनेटवरील हा परवलीचा शब्द ठरला. फेसबुक, वॉट्सअॅप, ट्विटर, इन्साटाग्राम सारख्या सोशल मीडिया साइट्सनी वापरकर्त्याचे विश्व व्यापून टाकले. केवळ संपर्क आणि व्यक्त होण्यासाठी वापरात येणाऱ्या या माध्यामांमध्ये वापरकर्त्याला स्वतःकडे खिळवून ठेवण्यासाठी नवे प्रयोग होताना दिसत आहेत. वापरकर्त्याची आवड आणि कल लक्षात घेऊन नवनवीन सुविधांचा मारा होत आहे. यातील मोठा बदल म्हणजे लिखिल मजकूरला व्हिडिओची साथ मिळाली. सामान्य युजरलादेखील व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त होणे सहज शक्य झाल्याने हळूहळू याची लोकप्रियता वाढली. त्यातच फेसबुकने ‘लाइव्ह व्हिडिओ’ हा नाविन्यपूर्ण प्राकार आपल्या युजर्ससाठी उपलब्ध करून दिल्याने आता फेसबुकवर व्हिडिओ स्वरुपातील पोस्ट मोठ्याप्रमाणावर दिसू लागल्या आहेत. काही प्रमाणात हा बदल स्तुत्य असला तरी काळजी करायला लावेल अशी त्याची दुसरी बाजूदेखील आहे. जी अधोरेखित करणे गरजेचे आहे. व्हिडिओ स्वरुपातील पोस्ट पाहाण्यासाठी अथवा अपलोड करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर इंटरनेट डाटा खर्ची पडतो, ज्याचा आर्थिक ताण वापरकर्त्याच्या खिशावर येतो. त्याचबरोबर लोकांमधील वाचनाची आवड कमीकमी होत चालल्याचे हे लक्षण आहे. अभ्यासपूर्ण अथवा माहितीपूर्ण असे उत्तम काही वाचण्यापेक्षा रोमांचक, अघटित, विनोदी अथवा मनोरंजनपर व्हिडिओ पाहाणे अथवा शेअर करण्याकडे लोकांचा कल अधिक असल्याचे दिसून येते. ज्यातून लोकांच्या बदलत चालेल्या अभिरुचीची जाणीव होते. हा बदल निश्चितच विचार करायला लावणारा अहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 4:33 pm

Web Title: how friends day videos and live videos are ruining our facebook walls
Next Stories
1 ‘या’ पाच गोष्टींमुळे दातांना पोहोचू शकते इजा
2 ‘कूलपॅड कूल वन’
3 वेक अप टू मेक-अप
Just Now!
X