विविध प्रजातींचे मासे घरात शोभेसाठी फिश टँकमध्ये ठेवले असले तरी काही माशांची विशिष्ट ओळख असते. काही माशांचा प्रसार एका विशिष्ट हेतूने केला जातो. अशा प्रकारच्या माशांच्या जातींमधील लोकप्रिय मासे म्हणजे गप्पी. आकर्षक रंग आणि शेपटीचा विशिष्ट आकार यामुळे हे गप्पी मासे फिश टँकमध्ये असल्यावर अतिशय सुंदर दिसतात. पूर्वी ब्रिटिश वेगवेगळ्या देशात फिरत असताना त्यांनी अनेक देशांत या गप्पी माशांचा प्रसार केला. ब्रिटिशांनी गटारांमध्ये फिलाटिया आणि गप्पी मासे सोडले. गटारावरील डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या गप्पी माशांचा उपयोग होत असल्याने बहुतांश देशांत गप्पी माशांचा कालांतराने विकास झाला. आपल्याकडे तर आजही ‘गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा’ अशी वाक्ये फलकांवर लागलेली दिसतात.

गप्पी मासे अंडी न घालता पिल्ले देत असल्याने त्यांना इंग्रजीत ‘लाईव्ह बेअर्स’ असे म्हणतात. मादी गप्पी मासे रंगात आढळत नाहीत मात्र नर गप्पी मासे विविध आकर्षक रंगांत आढळतात. वर्षांनुवर्षे या माशांचे योग्यरीत्या ब्रिडिंग करून अतिशय सुंदर आणि आकर्षक मासे तयार केले आहेत. या माशाच्या खूप प्रजाती अस्तित्वात आल्यावर मत्स्यप्रेमींमध्ये हे गप्पी मासे लोकप्रिय ठरले. वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिडिंग केल्यावर आकर्षक रंगात हे गप्पी मासे उपलब्ध झाले. सुरुवातीला अतिशय लहान असणारे हे मासे कालांतराने थोडे मोठय़ा आकारात अस्तित्वात येऊ लागले. या माशांची शेपटी साधारण एक इंचाएवढी होती. साध्या गप्पी माशांपेक्षा वेगळे असल्याने ‘फॅन्सी गप्पी’ अशी या माशांची ओळख झाली. यानंतर हळूहळू प्रसार झाल्यावर अनेक घरांतील फिश टँकमध्ये गप्पी मासे दिसू लागले.

Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi
मटणासारखं गावरान पद्धतीचं मुशी मच्छीचं झणझणीत कालवण; ही घ्या सोपी रेसिपी
health benefits of fenugreek seeds
तुम्ही १४ दिवस मेथीचे दाणे खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…
loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
Gudipadwa 2024 special recipe how to make amrakhand mango shrikhand recipe
गुढीपाडव्याला खास ‘आम्रखंड-पुरीचा बेत! मग घरीच सोप्या पद्धतीने बनवा ‘आम्रखंड’; ही घ्या रेसिपी

संपूर्ण वाढ झालेले गप्पी मासे दर पंधरा दिवसांनी पिल्ले घालतात. एका वेळी हे मासे पन्नास ते ऐंशी पिलांना जन्म देतात. साधारण चार महिन्यांएवढा काळ या माशांची पूर्ण वाढ होण्यास लागतो. पिल्ले देण्यासाठी ही मादी परिपूर्ण असली की सर्व मादी माशांना एका टँकमध्ये ठेवले जाते. त्यातच असंख्य पिल्ले हे मासे घालतात आणि त्यानंतर या मादी माशांना स्वतंत्र ठेवले जाते.

विविध प्रजाती लोकप्रिय

मूळ गप्पी माशांचे ब्रिडिंग केल्यावर वेगवेगळ्या प्रजाती अस्तित्वात आल्या. अंबरनाथमध्ये राहणाऱ्या अल्बर्ट यांच्याकडे गप्पी माशांच्या अनेक प्रजाती आहेत. यात संपूर्ण लाल डोळे असणारे अल्टिनो फूल रेड गप्पी, ब्लॅक आय गप्पी, अल्टिनो पिंक, ग्रास व्हरायटी गप्पी माशांच्या शेपटीवर काही रेषा आढळतात. तसेच मॉस्को ग्रू, नोर्मल फँटल गप्पी असे काही प्रजातीचे मासे अल्बर्ट यांच्याकडे आहेत. यात मॉस्को ग्रू या माशाचे वैशिष्टय़ म्हणजे साधारण हे मासे काळे दिसतात. प्रत्यक्षात या माशांवर बॅटरीचा प्रकाश टाकला की हे मासे निळ्या रंगाचे दिसतात. मोठय़ा प्रमाणावर वेगवेगळ्या पद्धतीने ब्रिडिंग होत असल्याने हल्ली मादी गप्पी मासेसुद्धा रंगात उपलब्ध होत आहेत.

आहाराची काळजी

गप्पी माशांना बहुतांश वेळा डास, जिवंत किडे, टय़ूबिप्लेक्स किडे खायला आवडतात. अनेकदा तयार अन्नदेखील हे मासे खातात. अंडी, ओट्स, पालक असे व्हिटामीन असणारे काही पदार्थ एकत्र करून त्याचा केक योग्य प्रमाणात या माशांना दिल्यास उत्तम आहार ठरतो. तसेच सुका जवळा स्वच्छ धुऊन चार ते पाच दिवस पाण्यात ठेवावा लागतो. मीठ पूर्ण निघून गेल्यावर त्यानंतर तो सुकवून त्याची पावडर करून या माशांना दिली तर आहारात समतोल राखता येतो. गप्पी मासे वास्तव्यास असणारे पाणी स्वच्छ आणि वाहते ठेवावे लागते.इतर माशांसोबत जुळवून घेण्याच्या गुणधर्मामुळे गप्पी माशांना बाजारात मागणी जास्त आहे.