News Flash

उन्हाळ्यात घर थंड कसं ठेवावं? वाचा

घर थंड ठेवण्यासाठी खास उपाय

सौजन्य- Indian Express

उन्हाळ्यात एसी शिवाय राहणं म्हणजे कठीणच असतं. मात्र प्रत्येकाला एसी घेणं परवडेल असं नाही. यासाठी उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकतात. यामुळे घर थंड राहील तसेच शारीरिक थकवाही दूर होईल. नैसर्गिकरित्या घरं कसं थंड ठेवण्यासाठी तुम्हाला उपाययोजना सांगणार आहोत.

  • नैसर्गिक सावली मिळावी यासाठी घराच्या अंगाणात झाडं लावावी. झाडाच्या सावलीमुळे घरात नैसर्गिकरित्या थंडावा मिळेल.
  • घराच्या बाल्कनीत आणि ओट्यावर झाडांच्या कुंड्या ठेवाव्या. स्पायडर प्लांट, कोरफड, पाम ट्री यासारखी घरात झाडं ठेवू शकता. त्यामुळे हवा शुद्ध होण्याबरोबर थंडावा मिळण्यास मदत होईल.
  • नविन घराची बांधणी करत असाल तर भिंतीची जाडी अधिक ठेवा. जेणेकरून उष्णतेची दाहकता आतमध्ये पोहोचणार नाही. तसेच घराची उंची निश्चित करा. त्यामुळे पंख्यातून उष्ण हवा फेकली जाणार नाही. तसेच छताला पांढरा रंग द्यावा.
  • टेबल फॅनसमोर बर्फाने भरलेला वाटगा ठेवावा. जेणेकरून थंड हवा येईल. तसेच खिडक्या आणि दारावर रात्री आणि दुपारी भिजलेले कपडे ठेवावे. तसेच घरात एलईडी लाईटचा वापर घरात करावा. एलईडी लाईटचं तापमान कमी असल्याने फायदा होतो.
  • उन्हाळ्यात घरात हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीट वापरावे. घरात कमीत कमी फर्निचर वापरा. त्यामुळे हवा मोकळी होण्यास मदत होते.
  • सूर्याच्या विरुद्ध दिशेने असलेली खिडक्या दारं उघडी ठेवा. यामुळे घरात उष्णता येणार नाही. याला क्रॉस व्हेंटिलेशन म्हणतात. यामुळे घरात थंडावा राहण्यास मदत होईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 3:54 pm

Web Title: how homes make cool in summer naturally tips rmt 84
टॅग : Summer
Next Stories
1 उन्हाळ्याचा त्रास होतोय? मग दिनचर्येसोबतच पाण्याच्या भांड्यांकडेही नीट लक्ष द्या!
2 आरोग्यवर्धक उन्हाळी पेयं
3 समजून घ्या : लहान मुलांना होणारा थॅलसेमिया हा आजार नक्की आहे तरी काय? त्याची लक्षणं आणि उपचार
Just Now!
X