News Flash

म्हाडाच्या घरासाठी कसा करायचा अर्ज ?

ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे

मुंबईत हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. म्हाडाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना ही सुवर्णसंधी दिली असून १३८४ घरांची सोडत जाहीर केली आहे. धनत्रयोदशीला म्हणजेच 5 नोव्हेंबरला ही घरांची सोडत निघाली आहे. १६ डिसेंबरला या सोडतीचा निकाल जाहीर होईल. म्हाडाने यावर्षी घराच्या किमतीसंदर्भात नवे धोरण आखले आहे. ज्यानुसार घरांच्या किंमती या 25 ते 30 टक्के कमी करण्यात आल्या आहेत.

या सोडतीत अत्यल्प गटासाठी ६३ सदनिका, तर अल्प गटासाठी ९२६ सदनिका आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनुक्रमे २०१ आणि १९४ सदनिका आहेत. या घरांची सोडत १६ डिसेंबर रोजी गृहनिर्माण भवनात ऑनलाइन काढली जाणार आहे. या सोडतीतील तपशिलाची जाहिरात आज प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याच वेळी ऑनलाइन अर्ज नोंदणीही सुरू होणार आहे. यासाठी १० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे.

दरम्यान तुम्हाला म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा असेल तर तो कसा करायचा हे जाणून घ्या…

Step 1 –

म्हाडाच्या वेबसाईटवर लॉग इन करा. तुम्ही lottery.mhada.gov.in or mhada.gov.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकता.

Step 2 –

वेबसाइटवर गेल्यावर रजिस्टर करा. तुम्हाला युजरनेम तयार करुन नंतर आपली माहिती ज्यामध्ये नाव, कुटुंबाचं उत्पन्न, पॅन कार्ड क्रमांक, जन्मतारीख, व्यवसाय, पत्ता, मोबाइल क्रमांक, लिंग तसंच विवाहित आहात की नाहीत ही माहिती भरावी लागेल.

यावेळी तुम्ही जो मोबाइल क्रमांक देणार आहात तो व्यवस्थित सुरु आहे की नाही तसंच भविष्यातही वापरणार आहात की नाही याची खात्री करा. कारण म्हाडा याच क्रमांकावर तुमच्याशी संपर्क साधणार आहे.

Step 3 –

एकदा युजरनेम तयार केल्यानंतर तुम्ही कधीही लॉग इन करु शकता. लॉग इन केल्यानंर तुम्हाला सध्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत याची माहिती मिळेल. पर्यायांमध्ये म्हाडा लॉटरी निवडल्यानंतर तुम्ही वैयक्तिक माहिती भरु शकता. यामध्ये उत्पन्न गट, आरक्षण श्रेणी आणि अर्जदार प्रकार ही माहिती भरावी लागेल.

तुम्ही स्कीम कोड भरणेही गरजेचे आहे. हा कोड तुम्हाला वेबसाइटवरही मिळेल. स्कीम कोड म्हणजे दुसरं काही नाही तर तुम्हाला जिथे घर घ्यायचं आहे ती जागा आहे. तुमच्या बँक खात्याची माहितीदेखील द्यायची आहे. यावेळी तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं शहरात दुसरं कुठेही मालकीचं घऱ नसल्याचं तुम्हाला जाहीर करायचं आहे.
संपर्कासाठी तुम्हाला सध्या राहत असलेल्या ठिकाणचा पत्ता द्यायचा आहे. सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्या.

Step 4 –

एकदा ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेन फी भरावी लागेल. तुम्ही डिमांड ड्राफ्ट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा एनईएफटी/आरटीजीएस करुन पैसे भरु शकता. ऑनलाइन पैसे भरण्यासाठी तुमच्या अकाऊंटमध्ये लॉग इन करा. अर्ज केलेल्या स्कीमच्या यादीसोबत तुम्हाला पेमेंटचा पर्याय दिसेल.

जर तुम्ही डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने पैसे भरणार असाल तर अर्जाची प्रिंट सोबत घ्या आणि बँकेत डिमांड ड्राफ्टसोबत जमा करा. जर तुम्ही ऑनलाइन पैसे भरणार असाल तर रद्द केलेला चेक अपलोड करा आणि म्हाडा बँक खात्यात पैसे जमा करा. तुम्ही पोर्टलवरुन पेमेंट स्लिम मिळवू शकता. ही प्रिंट भविष्यात व्यवहार करताना तुमच्या कामी येईल.

कोणत्या भागात किती घरं – 

– अँटॉप हिल वडाळा भागात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 278 घरं उपलब्ध आहेत ज्याची किंमत 30 लाख 71 हजार असणार आहे.
– प्रतिक्षा नगर सायन येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी 83 घरं आहेत ज्याची किंमत 28 लाख 70 हजार 700 असणार आहे.
-मानखुर्दमध्ये 114 घरं आहेत जी अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहेत. या घराची किंमत 27 लाख 26 हजार 757 असणार आहे.
– गव्हाणपाडा मुलुंड या ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी 269 घरं आहेत ज्याची किंमत 30 लाख 7 हजार 757 रुपये असणार आहे.
– सिद्धार्थ नगर गोरेगावमध्येही 24 घरं उपलब्ध आहेत जी अल्प उत्पन्न गटासाठी असून त्याची किंमत 31 लाख 85 हजार असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 5:47 pm

Web Title: how to apply for mhada home
Next Stories
1 दुष्काळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
2 अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3 जलयुक्त शिवार हे सरकारचं प्रचंड यश: फडणवीस
Just Now!
X