आपण अनेक वेळा रेल्वेन प्रवास करत असतो. मात्र, गाडी वेळेवर आहे की उशिरा, याची माहिती मिळत नाही. किंवा गाडी कोठे आली आहे. वेळेवर येईल का? याची सतत चिंता असते. मात्र, आता याची चिंता करायची करायची गरज नाही. कारण रेल्वे कोठे पोहोचलेय. उशिरा आहे की वेळेवर याची माहिती तुम्हाला व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. तीही तात्काळ. ट्रेनची माहिती मिळविण्यासाठी आता 139 किंवा अन्य कोणत्याही अॅपवर जाण्याची यापुढे गरजच उरलेली नाही. कारण आता ट्रेनचा लाईव्ह स्टेटस तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅपवर उपलबद्ध होणार आहे. रेल्वे आणि MakeMyTrip या वेबसाईटचा सामंजस्य करार झाला आहे.

यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अपडेट करावे लागेल. त्यानंतर आपल्या फोनमध्ये MakeMyTrip चा फोन नंबर 7349389104 सेव्ह करा. मेक माय ट्रिपचा क्रमांक व्हॉट्सअॅपमधून ओपन करा. ट्रेनचा नंबर त्यामध्ये टाईप करुन मेसेज पाठवा. मेसेज पाठवताच तुम्हाला हवे असलेल्या ट्रेनचे स्टेटस मिळेल. तसेच याच पद्धतीने पीएनआर नंबर व्हॉट्सअॅपवर मेसेज करा. यामुळे तुम्हाला तुमच्या तिकिटाचे स्टेटसही मिळेल. महत्वाचे म्हणजे सर्व्हर व्यस्त नसेल तर केवळ 10 सेकंदांत ही माहिती मिळणार आहे. यासाठी पाठवलेल्या मेसेजला ब्लू टीक होणे गरजेचे आहे.