तुम्हाला जर गोड स्वप्ने पडत असतील तर तुमचे मन शांत असल्याचे ते लक्षण आहे, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. स्वप्न आणि उत्तम मन:स्थिती यांचा संबंध जाणून घेताना संशोधकांनी हा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. आतापर्यंत मधुर स्वप्ने पडणे ही केवळ एक सकारात्मक बाजू मानली जात होती. त्यातून संशोधकांनी विविध व्याधींनी त्रस्त किंवा अस्थिर मन असलेल्या लोकांच्या स्वप्नांवरच संशोधन केले होते.

मात्र या अभ्यासाच्या आधारे चांगले स्वप्न व त्याचा मनावरील परिणाम याची सकारात्मक बाजू पहिल्यांदाच पुढे आली आहे. स्वप्ने मग ती चांगली असो वा वाईट त्याच्या विविध अंगांनी अभ्यास करून, मानसिकतेशी त्याचा संबंध जोडणे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, असे पिलीरियन सिक्का या संशोधकांनी स्पष्ट  केले. त्या अंगाने असा हा पहिलाच अभ्यास असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

संशोधनादरम्यान सहभागी होणाऱ्यांना चांगली व वाईट स्वप्ने याबाबत माहिती देण्यास सांगितले होते. प्रश्नावलीच्या आधारे ज्यांना चांगली स्वप्ने पडतात त्यांचे मत अधिक शांत असल्याचे तीन आठवडय़ाच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे ज्या व्यक्तींची मन:स्थिती चांगली नाही त्यांना स्वप्नेही चांगली पडत नाहीत. त्यातून त्यांच्या प्रकृतीत काहीतरी गडबड आहे असे सिक्का यांनी स्पष्ट केले. ज्यांचे मन अधिक स्थिर आहे त्यांना भावनांवर नियंत्रण उत्तम प्रकारे ठेवता येते हेच या संशोधनातून सिद्ध झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.