टेलिकॉम क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या रिलायंस जिओकडून आता आपल्या ग्राहकांना फ्री वाय-फाय कॉलिंगची सेवा दिली जात आहे. बुधवारी कंपनीने देशभरातील ग्राहकांसाठी ‘व्हॉइस अँड व्हिडिओ कॉलिंग ओव्हर वाय-फाय’ ही सर्व्हिस सुरू करत असल्याची घोषणा केली. या नव्या सेवेनुसार तुम्ही सध्याचा क्रमांक वापरुनच कोणत्याही वाय-फाय नेटवर्कद्वारे मोफत व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलिंग करु शकाल. यासाठी कोणतेही अतिरिक्त दर आकारले जाणार नाहीत. जर तुमच्याकडे एखादा प्रीमियम स्मार्टफोन असेल तर, काही सेटिंग्समध्ये बदल करुन तुम्ही वाय-फायद्वारे मोफत कॉलिंग करु शकतात. व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग दरम्यान ग्राहक VoLTE आणि वाय-फायमध्ये सहजपणे स्विच करु शकतात असा जिओचा दावा आहे. जिओची वाय-फाय कॉलिंग सेवा 150 पेक्षा अधिक हँडसेट मॉडेल्सला सपोर्ट करेल. ही सेवा 7 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान संपूर्ण भारतात उपलब्ध होईल. सेटिंग्समध्ये काही बदल करुन ही सेवा अ‍ॅक्टिव्ह करता येईल.

अँड्रॉइडसाठी सेटिंग्स-
– आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसच्या सेटिंग्स पर्यायावर जा
– येथे कॉल सेटिंग्स पर्यायावर क्लिक करा किंवा डिव्हाइसमध्ये Wi-Fi कॉलिंग ऑप्शन सर्च करा
– या ऑप्शनसमोर दिसणारे स्विच Enable किंवा On करा
-उत्तम अनुभवासाठी  VoLTE आणि वाय-फाय कॉलिंग हे दोन्ही स्विच ऑन ठेवा

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

आयओएससाठी सेटिंग्स- 
– iOS डिव्हाइसच्या सेटिंग्स पर्यायावर जा
– येथे तुम्हाला Phone सेटिंग्सवर टॅप करा आणि Wi-Fi Calling पर्यायासाठी सर्च करा
– त्यासमोर असलेलं स्विच Enable किंवा On

आणखी वाचा – Jio ची नवी सेवा , Free मध्ये करा व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग

जिओकडून 150 पेक्षा अधिक स्मार्टफोनमध्ये या सेवेसाठी सपोर्ट देण्यात आला आहे. Apple iPhone 6s आणि यानंतर आलेल्या आयफोनशिवाय फ्लॅगशिप सॅमसंग डिव्हाइस, Samsung Galaxy Note 10, Galaxy S10 मध्येही वाय-फाय कॉलिंग सपोर्ट आहे. Samsung Galaxy M20, Galaxy A70, Redmi K20, Redmi K20 Pro आणि Poco F1 यांसारख्या मिडरेंज स्मार्टफोनमध्येही सपोर्ट मिळेल. पण, वनप्लस किंवा ओप्पोचा एकही डिव्हाइस या यादीमध्ये नाहीये.