25 April 2019

News Flash

Netflix, Amazon Prime वरील व्हिडीओ मोफत बघायचेत? मग हे वाचाच…

मोफत सबस्क्रिप्शन कसं मिळवायचं याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत

भारतात मोबाइल इंटरनेटचा वाढता वापर लक्षात घेऊन Netflix आणि Amazon Prime सारखे अॅप्स दिवसेंदिवस नवनवे ‘ओरिजिनल व्हिडीओ’ घेऊन येत आहेत. हे व्हिडीओ केवळ Netflix आणि Amazon Prime वरच पाहता येतात, म्हणजे यासाठी पैसे भरुन संबंधित अॅपचं सदस्यत्व ( सबस्क्रिप्शन) घेणं आवश्यक असतं. त्यामुळे या अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन कसं मिळवायचं याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. मात्र, यासाठी तुम्हाला दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा पोस्टपेड प्लॅन घ्यावा लागेल.

एअरटेलच्या ग्राहकांसाठी… एअरटेल आपल्या पोस्टपेड ग्राहकांना  499 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या सर्व प्लॅन्समध्ये अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन अगदी मोफत देत आहे. याच प्लॅन्समध्ये एअरटेलकडून नेटफ्लिक्सचं 3 महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन दिलं जात आहे. याशिवाय एअरटेलचे युजर्स ZEE5 अॅपवरही व्हिडीओजचा आनंद घेऊ शकतात. याशिवाय जर तुम्ही आधीपासूनच नेटफ्लिक्स वापरत असाल तरीही तुमच्याकडे 1500 रुपयांचा नेटफ्लिक्स बॅलेंस दिला जाईल. ही ऑफर केवळ एअरटेलच्या युजर्ससाठी आहे.

व्होडाफोनच्या ग्राहकांसाठी… व्होडाफोन आपल्या सर्व रेड पोस्टपेड प्लॅन असणाऱ्या ग्राहकांना अॅमेझॉान प्राईमचं सदस्यत्व मोफत देत आहे. त्यामुळे अॅमेझॉनच्या सर्व सेवांचा लाभ व्होडाफोनच्या ग्राहकांना घेता येणार आहे.

BSNL च्या ग्राहकांसाठी… बीएसएनएल आपल्या ग्राहकांना 399 रुपये किंव त्यापेक्षा जास्त पोस्टपेड मोबाइल प्लॅन अथवा 745 आणि त्यापेक्षा जास्तीच्या ब्रॉडबँड प्लॅनवर अॅमेझॉन प्राइमचं सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. याशिवाय नेटफ्लिक्सशी भागीदारीचाही प्रयत्न बीएसएनएलकडून सुरू आहे.

रिलायंस जिओच्या ग्राहकांसाठी… जिओच्या ग्राहकांना अॅमेझॉन किंवा नेटफ्लिक्सवरील व्हिडीओचा आनंद घेता येणार नाही. कारण जिओने कोणाशीही भागीदारी केलेली नाहीये.मात्र, इरोस इंटरनॅशनल किंवा एएलटी बालाजी अॅपवरील व्हिडीओ जिओ युजर्सना पाहता येणार आहेत. जिओ सिनेमा किंवा जिओ टीव्हीवर हे व्हिडीओ पाहता येतील. ALT बालाजी सध्या विविध भाषांमध्ये 14 ओरिजिनल शो करत आहे.

First Published on December 6, 2018 3:20 pm

Web Title: how to get amazon prime and netflix free subscription airtel vodafone bsnl users get it free