28 January 2021

News Flash

विमा आणि गुंतवणुकीतून योग्य मोबदला मिळण्यासाठी हे लक्षात ठेवा 

लाइफ कव्हरेजसोबत जीवन विमा उत्पादने गुंतवणूक आणि  एंडोमेंट प्लॅन्स व यूएलआयपीसारखी करामध्ये बचत करणारी उत्पादने देखील असू शकतात.

२५ ते ३५ वयोगटातमधले वाढत्या संख्येतील आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेले अनेक लोक आजकाल करामध्ये बचत करण्याच्या उद्देशाने तसेच एजंट्सच्या दबावामुळे आपले पैसे विमा उत्पादनांमध्ये गुंतवताना आढळून येतात. व्यक्तीचे अचानक निधन होण्याच्या स्थितीत त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीला आर्थिक जोखमीपासून सुरक्षित करणे हा त्यामागचा प्राथमिक उद्देश असतो. लाइफ कव्हरेजसोबत जीवन विमा उत्पादने गुंतवणूक आणि  एंडोमेंट प्लॅन्स व यूएलआयपीसारखी करामध्ये बचत करणारी उत्पादने देखील असू शकतात. कधी कधी हे तुलनेने कमी प्रमाणात प्रभावी असलेले संमिश्रण असू शकते. गुंतवणूक आणि विमा या व्यक्तिगत वित्ताच्या दोन संकल्पनांना अतिशय उत्तम प्रकारे वेगवेगळे हाताळता येऊ शकते.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्किम (इएलएसएस) 

इएलएसएस म्युच्युअल फंड योजना आहेत ज्या बाजारपेठेशी निगडीत संपत्तीमध्ये गुंतवणूक करतात. त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असते. परंतु, त्यात जोखीम देखील असते कारण तुमचे पैसे बाजारपेठेशी निगडीत सिक्युरिटीजमध्ये गुंतवलेले असतात. तुम्हाला आर्थिक वर्षामध्ये इएलएसएसमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर कलम ८०(सी) अन्वये १.५ लाख रुपयांच्या करावरील कपातीचा लाभ घेता येऊ शकतो. जर मिळवलेली रक्कम १ लाख रुपयांहून जास्त असेल तर, इएलएसएसमधून मिळवलेल्या जास्त कालावधीसाठीच्या भांडवल लाभावर १० टक्के कर आकारला जातो. कमी कालावधीमधल्या लाभावर तुम्ही १५.४५ टक्के कर भरता.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) 

कमी जोखीम घेण्याची वृत्ती असलेल्या तद्दन गुंतवणूकदारांसाठी हा गुंतवणूकीचा अतिशय योग्य पर्याय आहे. उत्तमप्रकारे कर सक्षम असण्यासोबत पीपीएफमध्ये केलेल्या गुंतवणूकीवर दर वर्षाला ७.६ टक्के व्याज मिळते. वर्षभरात तुम्ही ५०० रुपयांपासून १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करु शकता. परंतु या योजनेचा परिपक्वता कालावधी १५ वर्षांचा असतो, तुम्ही सातव्या वर्षापासून रक्कम काढता येते. लॉक इन कालावधी खरेपाहता नकळतपणे मिळालेले एक वरदानच ठरते, कारण त्यामुळे तुमच्या घाई घाईने रक्कम काढण्यावर नियंत्रण ठेवले जाते. तुम्ही तिस-या वर्षापासून रकमेवर कर्ज देखील घेऊ शकता.

फाइव्ह इयर फिक्स्ड डिपॉजिट

हा बॅंक आणि पोस्ट ऑफिसकडे असलेला पंचवार्षिक गुंतवणूकीचा पर्याय आहे. आजमितीला पंचवार्षिक ठेवींचा व्याजदर ६.५ टक्के ते ८.५० टक्केच्या दरम्यान आहे. मुदत ठेवींवर मिळणा-या व्याजावर जरी कर आकारला जात असला तरी, १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूकीच्या रकमेवर कलम ८०सी अन्वये करामधून सवलत मिळते. पंचवार्षिक ठेव योजनेमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे किंवा क्षमतेनुसार रक्कम गुंतवण्याची मुभा असते.

नॅशनल सेव्हिंग्ज (एनएससी)

ही आणखीन एक पंचवार्षिक योजना आहे आणि यात केलेली कोणतीही गुंतवणूक कर मुक्त असते. मिळालेला मोबदला अखेरच्या वर्षाखेरीज करामधून वगळला जातो. सध्या वार्षिक व्याज दर ७.६ टक्के एवढा आहे. १०० रुपयापर्यंतची किमान रक्कम एनएससीमध्ये गुंतवता येते, तुम्ही जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता.

सुकन्या समृध्दी योजना  

भारतातील प्रत्येक मुलीसाठी गुंतवणूक रकमेच्या निर्माणासाठीचे पाऊल म्हणून या योजनेची ओळख करुन देण्यात आली होती. सध्या ८.१ टक्के व्याज दिले जाते आणि ते उत्पन्न कर अधिनियमाच्या कम ८०(सी) अन्वये कराचा लाभ देते. मुलीच्या जन्मापासून ती १० वर्षांची होईपर्यंत हे खाते कधीही उघडता येऊ शकते. तुम्हाला या खात्यात किमान २५० रुपयांपासून ते कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत एका आर्थिक वर्षात रक्कम जमा करता येऊ शकते.

आदिल शेट्टी

सीइओ, बॅंकबझार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 11:07 am

Web Title: how to get more income from insurance and investment
Next Stories
1 वजन घटवण्यासाठी करिना वापरते ‘हा’ फंडा !
2 भारतात इंटरनेट युजर्सचा आकडा धक्कादायक
3 आनंदी राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचा विचार करणे थांबवा
Just Now!
X