प्रथिनांचे (प्रोटीन) उत्पादन हजारो पटींनी वाढविता येईल, अशी प्रक्रिया शास्त्रज्ञांनी शोधली आहे. या शोधामुळे प्रथिनआधारित औषधे, लसींच्या किमती आणि रोगनिदान चाचण्यांचा खर्च कमी होऊ शकतो.

मुँह में दही काहे जमा है रे?; ‘आर्टिकल १५’च्या दिग्दर्शकाचा सेलिब्रिटींना सवाल

प्रथिने ही अमिनो आम्लांच्या रेणूंच्या साखळीसारख्या रचनेतून निर्माण झालेली असतात. वैद्यकीय वापरासाठी किंवा व्यापारी दृष्टिकोनातून प्रथिनांची निर्मिती करण्याची प्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची, खर्चीक आणि वेळखाऊ असू शकते. इन्सुलिन हे प्रथिनआधारित औषधाचे उदाहरण आहे. अशी औषधे तयार करण्यासाठी प्रथिननिर्मिती संचात विशिष्टरीत्या तयार केलेले जिवाणू सोडून प्रक्रिया घडविली जाते. अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली. यामध्ये भारतीय वंशाचे संशोधक मनस्वी वर्मा यांचा समावेश आहे.

Viral Video : ‘देसी जस्टिन बिबर’वर नेटिझन्स झाले फिदा

प्रथिनांमधील साखळीत असलेली पहिली काही अमिनो आम्ले ही त्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण असतात, असे यापूर्वी झालेल्या संशोधनात आढळून आले होते. आता झालेल्या नव्या संशोधनात शास्त्रज्ञांनी या साखळीतील पहिल्या काही विशिष्ट अमिनो आम्लांचा क्रम बदलला. असे केल्यानंतर संबंधित पेशींमधील प्रथिनांचे उत्पादन वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबतच्या प्रयोगाची माहिती ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे.

‘सोशल मीडियावर नको आता थेट मैदानात भेटा’; फरहान अख्तर उतरणार आंदोलनात

याविषयी वॉशिंग्टन विद्यापीठातील सर्गेज डीज्युरानोव्हिक यांनी सांगितले की, ‘‘जर आपण प्रत्येक जिवाणूकडून प्रथिनांची दहापट अधिक निर्मिती करून घेऊ शकलो, तर तेवढेच उत्पादन घेण्यासाठी आपणास तुलनेत केवळ एकदशांश जिवाणूंची गरज (आकारमानाने) भासेल. त्यामुळे उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल. सर्व प्रकारच्या प्रथिनांच्या निर्मितीसाठी हे तंत्र वापरता येणे शक्य आहे.’’