07 August 2020

News Flash

पाठदुखीनं त्रस्त आहात? आजच बदला ‘या’ सवयी

ही काळजी घ्या अन् पाठदुखीपासून मिळवा आराम

(प्रातिनिधिक छायाचित्र)

How To Get Rid Of Back Pain : पाठदुखी, कंबरदुखी आणि मणक्यांचे आजार केवळ वाढत्या वयातच होतात असे नाही. तरूण आणि अगदी लहान वयातही चुकीची जीवनशैली या आजारांना कारणीभूत ठरू शकते. पाठ दुखायला लागली की जणू काही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा कणाच मोडतो. सततच्या पाठदुखी आणि कंबरदुखीपासून आराम हवा असल्यास तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील. पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास कमी व्हा म्हणून काही जण घरगुती उपाय अवलंबतात पण त्याआधी सवयीमध्ये बदल होणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात आपल्या कोणत्या सवयी आहे ज्या बदलल्यामुळे पाठदुखीतून आराम मिळू शकतो….

मुलायम/सॉफ्ट गादीवर झोपणं :
आराम मिळतो म्हणून आपण अतिशय मुलायम किंवा सॉफ्ट गादीवर झोपतो. पण मुलायम गादीवर झोपण्यामुळे स्पाइन पोजीशन खराब होऊ शकते. त्यामुळे तुमची पाठदुखी वाढू शकते.

झोपण्याच्या पद्धती :
ट्रेनमध्ये मान तिरकी करून झोपणे, जेवणानंतर लगेच कोणत्याही स्थितीत झोपणे, मोठय़ा उशा घेऊन वाचत बसणे, तसेच झोपणे, मान मोडत बसणे, सतत मान हलवत रहाणे या कारणांनीच या व्याधी बळावतात. झोपतांना आपल्या शरीराच्या अवयवांचे भान ठेवून झोपणे गरजेचे आहे.

चुकीच्या पद्धतीनं बसणं :
चुकीच्या पद्धतीनं बसणं आपल्या पाठदुखीचं कारण असू शकते. घरात दुरचित्रवाणीवरील कार्यक्रम पाहाताना, लॅपटॉप किंवा मोबाइल फोन वापरताना तुम्हाला बसण्याचं भान राहत नाही. त्यावेळी तुम्ही केसेही बसता. तुम्ही शरीराच्या पोजीशनकडे ध्यान देत नाही.. पण खूपवेळ बसल्यानंतर कंबर दुखायला सुरुवात होते. त्यामुळे बसताना नेहमी काळजी घ्या..

एकाच पोजिशनमध्ये बसणे किंवा ऑफिसची बैठक :
एकाच पोजिशनमध्ये तुम्ही तासनतास बसत असाल तर तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखीसारख्या समस्यला सामोरं जावं लागेल. भारतामध्ये एकसुद्धा ऑफिस असे नाही की जिथे शरीररचनेचा अभ्यास करून टेबल- खुर्चीची उंची, कामाच्या स्वरूपावरून आखली आहे. अर्थात विविध प्रकृतीच्या व्यक्ती त्या एकाच टेबलावर येणाऱ्या असतात, म्हणून अडचणी असतील.

वजन उचलणे :
कधीकधी आपण अवाक्याबाहेरचं वजन उचण्याचा प्रयत्न करतो, अशावेळी कंबरदुखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

चुकीचा व्यायाम :
अनेकजन व्यायाम शाळेत चुकीच्या पद्धतीनं व्यायाम करतात, असा लोकांना पाठदुखी आणि कंबरदुखीसारक्या समस्येला सामोरं जावं लागते. व्यायाम करणं शरीरासाठी फायद्याचं आहे मात्र चुकीच्या पद्धीनं व्यायाम करणे तुमची डोकेदुखी वाढवू शकते.

दुचाकी वाहने :
रस्त्यावरील गतिरोधक, रस्त्यातील खड्डे, दुचाकी वाहनांवर जास्त फिरणे या कारणांनी मणक्यांवर अधिक ताण पडून गादीला इजा पोहोचते. शरीरस्थ विकृत वात इतस्तत फिरून व्याधी बळावते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 1:48 pm

Web Title: how to get rid of back pain if you are troubled by back pain then leave today these 7 habits that increase back pain back pain reasons nck 90
Next Stories
1 एकाच नंबरवरुन अनेक डिव्हाइसवर वापरता येणार WhatsApp, लवकरच रोलआउट होणार नवं फीचर
2 4G स्पीड : Jio ने सर्व स्पर्धक कंपन्यांवर केली मात, व्होडाफोन-आयडियानेही केली कमाल
3 स्वस्त झाले Mi True Wireless Earphones 2 , जाणून घ्या नवी किंमत
Just Now!
X