गुलाबी थंडीत, गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे नाजूक असलेल्या ओठांना जास्त हानी पोहोचते. त्यामुळे ओठ फाटण्याची समस्या सर्वाधिक जाणवते. पण, फक्त थंडीच नाही तर वातावरणातील बदल, वाढते वय आणि ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळेदेखील ओठ फुटतात. म्हणूनच नेहमीच आहारात ‘ब’ जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करा. फळे, भाज्या, मासे, अंडी, सुकामेवा, दूध हे पदार्थ आहारात असलेच पाहिजे. याशिवाय ओठांवर सौंदर्यप्रसाधन वापरण्यापूर्वी काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. कारण सौंदर्यप्रसाधनामधल्या रसायनांमुळे ओठांवरच्या नाजूक त्वचेला नुकसान पोहोचतं. त्यामुळे नाजूक ओठांचं सौंदर्य जपण्यासाठी दिवसातून किमान एकवेळा खालील गोष्टी करा.

Beauty Tips : हिवाळ्यात अशाप्रकारे त्वचेची काळजी घ्या

..म्हणून मांसाहारी पदार्थ खाल्ल्यानंतर पिकलेली पपई खावी

– सकाळी आणि रात्री दात घासतांना ब्रश ओठांवरून अलगद फिरवावा, त्यामुळे ओठावरील मृत त्वचा निघून जाते.- ओठ दाताने कुरतडण्याची सवय टाळा, सवयीमुळे ओठांच्या त्वचेला हानी पोहोचते. ओठांचे पापुद्रे निघतात, भेगा पडतात, त्वचा खेचली गेल्याने त्यातून रक्त येते, यामुळे ओठ राठ पडतात.
– रात्री झोपताना व्हॅसलिन आणि लिंबाचा रस एकत्र करून ओठांना लावा त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
– थंडीच्या दिवसात ओठांवरची त्वचा अधिक रुक्ष होते म्हणून रात्री झोपताना शेंगदाण्याच्या तेलाने ओठावर मसाज करून नंतर सुती कपडय़ाने पुसून घ्या. ओठ नरम राहण्यास मदत होते.
लिपस्टिक लावताना या गोष्टी करा
– रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे. लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे होणारं ओठांचं नुकसान भरून निघतं.
– लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा.
– त्याचप्रमाणे लिपस्टिक ओठांवर दिर्घकाळ टिकण्यासाठी ती काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून लावली.