News Flash

डाएटमध्ये या पदार्थांचा समावशे करा आणि जपा त्वचेचे सौंदर्य

हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात त्वचेचं सौंदर्य जपणं हे अनेकांच्या समोरचं एक आव्हान आहे. पण काही सोप्या उपायांनी त्यावर मात करता येते.

प्रातिनिधिक छायाचित्र (सौजन्य - शटरस्टॉक)

त्वचेचे सौंदर्य हे स्त्री आणि पुरुषांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं असतं. त्यातही हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात त्वचेचं सौंदर्य जपणं हे अनेकांच्या समोरचं एक आव्हान आहे. पण, हेच आव्हान पेलण्यासाठी फार काही नाही तर आपल्या आहाराच्या सवयींमध्ये थोडे बदल करण्याची आवश्यकता असते. आणि एकदा हे जमलं की मग त्याचे मिळणारे फायदे तुम्हाला चकीत करतीय यात शंका नाही. पाहूयात असे कोणते पदार्थ आहेत ज्यांचा आहारात समावेश केल्याने त्वचेचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.

संत्री – क जीवनसत्वाने परिपूर्ण असणाऱ्या संत्र्याच्या सेवनाचा त्वचेला चांगलाच फायदा होतो. त्वचेतील पेशी आणि कोमेजलेले घटक तरतरीत होण्यासाठी याचा फायदा होतो. त्वचा चमदार करण्यासाठीही संत्र्याचे सेवन उपयुक्त ठरते.

टोमॅटो- अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करणाऱ्या टोमॅटोमध्ये त्वचेसाठी उपयुक्त असे घटक असतात. त्यामुळे वाढत्या वयाची चिन्हे त्वचेवाटे दिसत नाहीत. बीट, पपई आणि द्राक्ष यांचाही त्वचेसाठी अँटिऑक्सिडंट म्हणून वापर होतो.

लसूण- केमिकल अॅलिसीनचं प्रमाण जास्त असणारा लसूणही त्वचेसाठी गुणकारी ठरतो. ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया आणि धोकादायक जीवाणूंशी लढा देण्यास मदत होते. त्याशिवाय चेहऱ्यावर येणारे चट्टे आणि डाग कमी करण्यासाठीही त्याची मदत होते.

सुकामेवा- शरीरासाठी आवश्यक असणारे घटक सुकामेव्यातून मिळवता येतात. ज्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

दही- त्वतेतील मृत पेशींचा नायनाट करुन तिचा तजेला वाढवणयासाठी दह्याचा वापर उपयुक्त ठरतो. त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होण्यासही दह्याचा चांगला उपयोग होतो.

मासे- सॅमन, सार्डिन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. ज्यांचा त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी खूपच फायदा होतो.

ब्रोकोली- क आणि ई जीवनसत्वाने परिपूर्ण असणारी ब्रोकोली अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते. त्यातील ई जीवनसत्वं हानिकारक यूव्ही किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी फायद्याचं असतं.

ब्ल्यूबेरी- त्वचा रुक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खाणं उपयुक्त ठरतं. त्वचेतील आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी याचा फायदा होतो.

गाजर- अ जीवनसत्वाने परिपूर्ण असणाऱ्या गाजराच्या सेवनामुळे त्वचेचं आरोग्य सुधारतं. त्यासोबतच सोरायसिसचा धोकाही टळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 6:02 pm

Web Title: how to keep your skin healthy by following diet plan
Next Stories
1 फोटो: महिंद्राच्या ‘माराझो’ गाडीचे भन्नाट फोटो आणि फिचर्स
2 सॅमसंगचा मोबाईल वापरताय? मग हे वाचाच
3 BSNL चे ९ आणि २९ रुपयांचे आकर्षक प्लॅन दाखल
Just Now!
X