News Flash

म्युच्युअल फंड आणि आधार कार्ड असे करा लिंक

रजिस्ट्रारच्या माध्यमातूनही करता येणार

म्युच्युअल फंड आणि आधार कार्ड असे करा लिंक

मोदी सरकारने अर्थिक व्यवहार जास्तीत जास्त सुरक्षित व्हावेत, यासाठी सर्व गोष्टी आधार कार्डला जोडण्याचे ठरवले आहे. याआधी बँक खाते, मोबाईल क्रमांक यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी आधारशी जोडल्या गेल्या. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे म्युच्युअल फंड खातेही आता आधारला लिंक करणे आवश्यक आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील सुधारणांनुसार हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष म्युच्युअल फंड कंपनीच्या कार्यालयात जावे लागणार आहे. ही जोडणी रजिस्ट्रारच्या माध्यमातूनही करता येऊ शकते.

सीएएमएस (कॅम्स), कार्वी, फ्रँकलिन टेम्पल्टन व सुंदरम बीएनपी पारिबा या संस्था रजिस्ट्रार म्हणून काम करतात. या रजिस्ट्रारकडे असलेल्या म्युच्युअल फंडांतील गुंतवणुका आधारशी जोडण्यासाठी या संस्था आपल्याला मदत करतात. एकाच रजिस्ट्रारकडे असलेल्या दोन म्युच्युअल फंडांमध्ये तुमची गुंतवणूक असेल तर त्या रजिस्ट्रारकडे तुम्हाला एकदाच आधार जोडणी करावी लागेल. हीच गुंतवणूक दोनपेक्षा अधिक रजिस्ट्रारच्या अंतर्गत येत असेल तर मात्र प्रत्येक रजिस्ट्रारकडे जाऊन आधार जोडणी पूर्ण करावी लागेल.

तुमचा मोबाइल क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असेल तर हे काम अधिक सोपे होते. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने आधार कार्ड जोडता येईल. यासाठी तुम्ही रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा पॅन व आधार क्रमांक भरा. त्यानंतर तुम्हाला मोबाइलवर वन टाइम पासवर्ड (ओटीपी) मिळेल. तो पासवर्ड भरल्यानंतर आधार क्रमांक म्युच्युअल फंड गुंतवणुकीशी जोडला जाईल. यानंतर हे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रारकडून ईमेलही येतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 3:20 pm

Web Title: how to link with mutual fund and aadhar card
Next Stories
1 फ्लिपकार्टचा स्मार्टफोन लवकरच बाजारात
2 प्रदूषणापासून आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा
3 अॅसिडीटीचा त्रास होतोय? हे उपाय करा
Just Now!
X