14 December 2017

News Flash

कोणत्याही वयात तरुण दिसायचंय? ‘या’ आहेत काही स्मार्ट टिप्स

सोपे आणि हटके उपाय करुन तर पाहा

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 18, 2017 2:23 PM

यंग दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स

आपलं कितीही वय झालं तरी आपण तरुण दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. यातही महिलांना आपलं वाढतं वय लपविण्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. मग डाय लावणे, वारंवार फिशिअल करणे, नवनवीन हेअरस्टाईलचा आधार घेणे असे प्रकार केले जातात. मात्र काही साध्या टिप्स अवलंबल्या तर तुम्ही तरुण दिसणे अगदी सोपे आहे. मात्र यासाठी दागिने, कपडे कोणते आणि कसे वापरावेत याबाबत योग्य ती माहिती असणे गरजेचे आहे. पाहूयात काय आहेत हे उपाय…

१. मान लहान असल्यास

तुमची मान लहान असेल तर तुम्ही केस वाढवायला हवेत. केस जितके लांब तितके चांगले दिसतात. हे केस जास्तीत जास्त वर बांधले तर चांगले दिसते. यामुळे तुमच्या मानेचा आकार लांब आणि छान दिसेल.

२. चांगला गॉगल वापरा

गॉगल हा तुमचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी एक उत्तम उपाय असू शकतो. चेहरा खुलून येण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे गॉगल तुम्हाला चांगला लूक देऊ शकतात. तुमचा चेहरा मोठा असेल तर तुम्हाला चौकोनी आकाराचा गॉगल चांगला दिसेल.

३. बारीक दिसायचंय?

आपलं वयं आहे त्यापेक्षा कमी दिसावं यासाठी नेमकं काय करावं हे अनेकदा आपल्याला कळत नाही. यामध्ये कपड्यांच्या निवडीचा भाग मोठा असतो. तुम्ही डार्क रंगाचा कोणताही वनपीस घातला तर तुमचे वय नक्की कमी दिसू शकेल. यामध्येही नेव्ही ब्लू, ब्लॅक, रेड हे कलर घातल्यास जास्त चांगले.

४. दागिन्यांची निवड

तुम्हाला यंग दिसायचे असल्यास दागिन्यांची निवड करतानाही तुम्ही भान ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये पारंपरिक दागिन्यांपेक्षा थोडे ट्रेंडी दागिने वापरल्यास जास्त चांगले दिसेल. यामध्येही मोठ्या आकाराच्या दागिन्यांपेक्षा थोडे नाजूक दागिने घातल्यास तुमचे वय आहे त्यापेक्षा नक्कीच कमी वाटेल. त्यामुळे गळ्यातील माळ, कानातले, ब्रेसलेट यांची निवड करताना योग्य ती काळजी घ्यावी.

५. हेअरस्टाईल

कोणतीतरी जुनाट हेअरस्टाईल केलीत तर तुम्ही वयस्कर दिसू शकता. केस तुम्हाला हवे तसे बांधले तरी ठिक आहे पण मध्यभागी भांग पाडलात तर वय जास्त दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे बाजूला भांग पाडावा. यामध्ये केस बांधले, मोकळे सोडले तरीही चांगले दिसतात. त्यामुळे हेअरस्टाईल करताना ही काळजी घेतलेली केव्हाही चांगली.

First Published on August 11, 2017 11:00 am

Web Title: how to look beautiful and young at every age tips