उन्हाळय़ात सूर्यकिरणांपासून डोळय़ांचे संरक्षण करण्यासाठी गॉगल महत्त्वाची भूमिका बजावतो. स्टाइल स्टेटमेंट म्हणून हा गॉगल वापरला जात असला तरीही आरोग्यासाठीही हल्ली तो तितकाच उपयुक्त असतो. आता हा गॉगल घेताना नेमकी कोणती काळजी घ्यावी, गॉगलची देखभाल कशी करावी हे लक्षात घेणेही आवश्यक असते. पाहूयात याविषयीच्या काही महत्त्वाच्या टीप्स…

गॉगलची योग्य देखभाल करणे आवश्यक आहे.

१. तुम्ही गॉगल खरेदी करता, तेव्हा तो तुम्हाला कसा दिसेल हे पाहाच, पण सूर्यकिरणांपासून संरक्षण करण्याची त्याची क्षमता किती आहे, हेही पाहणे महत्त्वाच आहे.

२. गॉगल खरेदी करताना त्यासोबत मायक्रोफायबर पाऊच किंवा बॉक्स घ्या. सनग्लास ज्यावेळी वापरत नसाल, त्यावेळी बॉक्समध्ये ठेवा.

३. अणकुचीदार वस्तूंमुळे गॉगलला तडा जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वस्तूंजवळ गॉगल ठेवू नका.

४.  बॅगमध्ये किंवा खिशात गॉगल ठेवू नका. चावी किंवा इतर वस्तूंमुळे त्याला तडा जाऊ शकतो.

५. गॉगलवर वारंवार धूळ बसल्याने तो खराब होतो. त्यामुळे धूळ लागणार नाही याची काळजी घ्या. तो नियमित मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्या.

६. गॉगल पुसण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. डिश डिर्टजटचाही वापर करू शकता, मात्र ती ब्लीचविरहित असली पाहिजे.

७. गॉगल पुसण्यासाठी कागदाचा वापर कधीही करू नका.

८. गॉगलचे नोज पॅड आणि काडय़ाही नियमित साफ केल्या पाहिजेत.