21 November 2019

News Flash

असा बनवा भाजणीचा ढोकळा

प्रथम भाजणी पीठ, बारीक रवा, हळद, ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून रात्रभर भिजवावे.

भाजणी ढोकळा

अदिती पाध्ये

साहित्य:
२ वाट्या भाजणीचे पीठ, २ चमचे बारीक रवा, दीड वाटय़ा आंबट ताक, तिखट १ चमचा, खायचा सोडा अर्धा चमचा, हळद १ चमचा, मीठ चवीनुसार.

कृती:

प्रथम भाजणी पीठ, बारीक रवा, हळद, ताक आणि अर्धी वाटी कोमट पाणी घालून रात्रभर भिजवावे. सकाळी त्यात तिखट, मीठ घालून ढोकळ्यासाठी पाणी उकळायला ठेवावे. पिठात खायचा सोडा घालून एकाच दिशेने फेटावे आणि लगेच वाफवायला ठेवावे. २० ते २५ मिनिटांनी गॅस बंद करून बाहेर काढून थंड होऊ द्यावे आणि वडय़ा पाडाव्यात. वरून तेल, हिंग, मोहरीची फोडणी घालावी.

First Published on June 25, 2019 2:44 pm

Web Title: how to make bhajani dhokla
Just Now!
X